Posts

Showing posts from 2018

वाट

वाट माझी एक नवीन कविता... एक वेगळेपण आहे .... प्रत्येक कडव्यात पहिल्या ३ ओळीत ६ अक्षरे  शेवटच्या ओळीत ४ अक्षरे  पहिल्या कडव्याचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या कडव्याचा पहिला शब्द.... अशी रचना झालीये कवितेची.... पहा कशी वाटतेय ते  विषय:  त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी..... ( त्याला हे ठाऊक नाही) दिवास्वप्न पाहाते.... त्याच्याशी मनोमन संवाद साधते.... त्याच्या साठी झुरते आणि वास्तव माहिती असूनही त्याची च वाट पाहतेय.... अशी ही वेडी.... तिच्या भावना रेखाटण्याचा प्रयत्न.... वाट दिवस सरले  कुणी न उरले मी ही का हरले  आर्त हाक  हाक रे प्रितीची  तुझ्या ओळखीची  बिकट वाटेची  मनी माझ्या माझ्या तू अंगणी  नाचे मी गगनी  पिंगा रे घालूनी  बेत स्वप्नी  स्वप्नी ध्यानी मनी  ये तो रात्रंदिनी  परी दिनवाणी  मी रे प्रिया प्रिया तूच प्रिय  करु सांग काय  की मी होय प्रिय तुज दिठी   दिठी जी आस   का विनासायास न कळे, हा भास  ...

ती च्या वळणावर

ती च्या वळणावर आज सहजच वळलो ' ती ' च्या वळणावर खूप पुढे गेलो आणि आलो आपसूकच भानावर ' ती ' च वळणच तस होत खट्याळ धुंद सुगंधी आकर्षक कितीही थांबवू ( स्वतःला ) म्हटलं तरी वळायचेच पाय आपोआप तिथवर ' ती ' ने काय नाही पाहिल आमची टवाळी यारी दोस्ती भेटी भांडण अन मस्ती आणि कधी केलेली दुनियादारी ' ती ' च्या वळणाकडे वळत जायचो हात हातात घालून गप्पा टप्पा मौजमजा करत शेवट व्हायचा समाधानी पोटपूजेत पण मजेचे दिवस संपत गेले मित्र देशी परदेशी उडून गेले उरलेले आम्ही अडकलो लग्नबंधनी हाय! आता ' ती ' ची आठवण फक्त स्वप्नी मधूनच कधीतरी ' ती ' च वळण आठवत खूप खूप विनाकारण पण फिरकायचही नाही तिकड हे मला ' स्वामिनी ' च साकड तेलकट खाऊ नये म्हणते आमची 'ही ' हृदयाच्या धमन्या होतील ब्लौक खातो आजकाल उकडलेल अन पुचाट ' ती ' करते मात्र डोक्यात क्लौक क्लौक असे सरलेत किती वर्षे माहित नाही ठेवतय कोण हिशोब परवा मात्र दचकलोच ... कारण पोरग वळल होत ' ती ' च्याच वळणावर आज विचारांच्या तंद्रीत हरवलो होतो अन ' ...

स्वातंत्र्य- आपापले

स्वातंत्र्य  - आपापले  ' मला माझ  स्वातंत्र्य खूप प्रिय  आहे. कुठल्याही  परिस्थितीत कुठल्याही कारणासाठी आणि  मुळात कुणासाठीही मी ते गमावू शकत नाही. ' इथे 'मी ' म्हणजे कुणीही बर का! मनुष्य प्राणी , प्राणी , देश, जमात, विचार आणि बरच काही. सजीवांच  म्हणाल तर मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की स्वातंत्र्याची जाणीव ही सर्वात पहिले! त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनुष्य! तस प्राणी असो वा पक्षी , त्यांनाही स्वातंत्र्य प्रियच आहे.  मात्र, त्यांनी निसर्गाच्या नियमांच पालन अजूनही चालू  ठेवल्याने ' स्वातंत्र्य ' हां विषय असा  काही फार अधोरेखित होत नाही. पण ... पण  जेव्हा हां स्वार्थी मनुष्य स्वत:च्या मनोरंजनासाठी म्हणा  किंवा इतर काही हेतूने या प्राण्यांच्या आणि एकंदरीतच निसर्गाच्या जीवनचक्रात हस्तक्षेप करतो, तेव्हा खरा स्वातंत्र्यावर घाला घातला जातो त्यांच्या. मग आलंच, गरज नसताना संघर्ष आणि  पुढील विस्कळीतपणा, सगळ्याच गोष्टींचा! मनुष्य , मग स्त्री असो वा पुरुष, स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता. कधी कानी कपाळी ओरडून सांगतो तर कधी मूकप...