थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ६. सहजीवनाचा सोहळा ....
थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ६. सहजीवनाचा सोहळा .... - शुभदा जगताप सहजीवनाची दशकपूर्ती - अक्षरश: याच शब्दात सकाळी सकाळी वडिलांनी फोन करून शुभेच्छा दिल्या .... ते दोन शब्द ऐकून खूप वेळ हसू आलं मला ... पण खरंच की .. सहजीवनाची १० वर्षे पूर्ण केली आज आम्ही! खूप साऱ्यांच्या शुभेच्छांचा पाऊस पडला ..... आणि गेल्या १० वर्षातील अनेक लहान सहान घटना डोळ्यासमोरून तरळून गेल्या. नाही म्हणता म्हणता एक दशकाचा टप्पा ओलांडला की हो आज आम्ही ! सहजीवन - काय अर्थपूर्ण शब्द आहे नाही ? एकमेकांना समजून घेऊन , गुण - दोषांसकट सांभाळून घेणे , रुसवे भुगवे , लग्नानंतरची दोघांचीही बरीचशी धडपड एकमेकांचा स्वभाव नीट कळेपर्यंतची .... किती काय काय असत ना या संसारात ? वाटतो इवलासा....सुरुवातीला .... पण कठीणही असतो तो बरेचदा... निभावता निभावता दमछाक होते काही जणांची .... तारेवरची कसरत ही असते कधी कध...