Posts

Showing posts from 2024

इश्क

 खुदा हमारे जैसे शौक  किसीको न दे  बस होश संभल जाये तबतक  पुरे फना हो बैठते है  शौक था हमे इश्क का  बस देखा करते थे ख्वाब  कही तो होगा हमसफर  जुनून यार के दिदार का हर वक्त जब दिल आया  तो न ही आवाज पहुची  ना हमारी तनहाईया  ना ही दिल की तेज धडकने  बस देखते गये  हमारी उम्मीदो का टुटना  अगणित मे बिखरना  फिर जे जुड जाने के लिये  इस उम्मीद मे की  कम्बखत कही तो वो दिल होगा  जो डूब जायेगा हमारे इश्क मे... हम इश्क के इंतजार मे  हर वक्त बेकरार... इश्क तो बरकरार है  इश्क तो बरकरार है.....

पाऊस आणि मी

 खूप साधं सरळ जीवन होतं... चटणी भाकरीच पण खूप चवीची  माणसं जवळ होती  मनाने  एका हाकेला धावणारी  घरं साधी सर्वांसाठी उघडी असायची हळू हळू दारं बंद होत गेली... आधी घरांची  मग मनांची  माणसांची.... आता एकटेपणा फक्त सोबत असतो आपल्या....नशीब तो तरी साथ सोडत नाही आपली....  आणि आपण शोधत बसतो कारणे त्यांची.... स्वतःतच.... न बोलता.... जाब न विचारता... स्वतःलाच....  मग मातीचे पुतळे तरी बरे अशी आपली अवस्था होते.... खोल खोल नेणारी  कधीही वर परत न आणणारी.... तरीही पाऊस मात्र येतो वेळेवर.... तो कोसळला की बरं वाटतं.... आपणही कोसळून मोकळे होतो.... मनातून  डोळ्यातून... पुन्हा नवीन सल भरून घेण्यासाठी..... मनात जागा तर रिकामी पाहिजे ना.... ती जागा हे कोसळणं करून देतं.... म्हणून  म्हणून  पाऊस खूप आवडतो.... धो धो कोसळणारा.... मोकळा होतो तो  मलाही तसं कर असं सांगत सांगत.... कोसळत राहतो.... आणि मीही.....

पुस्तक परिचय - एक भाकर तीन चुली

 पुस्तकाचे नाव  -  एक भाकर तीन चुली     भाषा - मराठी    लेखकाचे नाव - श्री देवा झिंजाड   प्रकाशन    -   NEW ERA Publishing House   परिचय कर्ती   - शुभदा जगताप जाधव, सातारा.  शिव-शक्ती , मधील शक्ती हे स्त्रीचे रूप ...  शक्ती - शारीरीक, मानसिक की दोन्ही? ती जर शक्तीचं रूप आहे , तर मग सर्वात जास्त (तुलनेने) अन्याय-अत्याचार तिच्यावरच का होतात ?  आणि या सगळ्याला तोंड देत देत शेवटच्या श्वासापर्यंत मातृत्व टिकविण्याची तिची जी धडपड आहे, त्यात तिच्या सहनशक्तीचा कस लागतो, तर तिने तरी कुठवर धीर धरावा?  हे  असे  एक ना अनेक प्रश पडत राहतात, दोन्ही डोळ्यांना धारा लागतात आणि वाचतोय ते सर्वकाही आपल्या समोर घडत आहे परंतु आपण हतबल आहोत, काहीच करू शकत नाही; फक्त निमूटपणे ते बघत राहणे आणि हळहळ  व्यक्त करणे - ती सुद्धा मनातल्या मनातच.... एवढेच आपल्या हाती आहे ...  बाई -माणसाने किती तडजोडी कराव्या? नवरा मेल्यावर अशा गावात जिथे रूढी-परंपरांना अन्यन्यसाधारण महत्व आहे, तिने किती...