Posts

गुजगोष्टी

उपेक्षितांचे अंतरंग उपेक्षित कुणास म्हणावे? बऱ्याच जणाना! कुणी प्रेमासाठी उपेक्षित, कुणी अन्नासाठी, वस्त्रासाठी आणि निवाऱ्यासाठीही. कुणी पाण्यासाठी तर कुणी देवाच्या कृपेसाठी. अनेक प्रकारानी उपेक्षा होते. पण एखादा जीवच जन्माला उपेक्षित म्हणून येतो कधीतरी कुठेतरी. नाईलाजास्तव त्या जिवाला जन्म दिला जातो. मग तिथूनच त्याची उपेक्षा, कुचंबणा सुरु होते. सर्वांत महत्वाची गोष्ट या जगात फक्त प्रेम आणि प्रेमच! म्हटलय कुणीतरी की प्रेमाने जगही जिंकता येत! आणि प्रेमाची उपेक्षा इतर सर्व उपेक्षापेक्षा सर्वांत भयानक दु:खदायक. त्या जीवाची सुरुवातच प्रेमाच्या उपेक्षेने आणि अंतही त्यातच! पण लहानपणापासूनच उपेक्षा ही त्या जिवाला बाळकडू सारखी वाटते आणि ते तस तस घडत जात, टणक होत आणि इतरांपेक्षा जीवनातील दु:खाना झेलण्यासाठी जास्त समर्थ बनतो. हृदयाची जखम सतत ओली ठेवत ओठांवर कायम हसू बाळगण, हेच त्या जीवाच प्रारब्ध! उपेक्षेतच त्याची उत्पत्ती, उपेक्षेतच स्थिती आणि लयही उपेक्षेतच! अजाण वयात त्या जीवाला मानसिक त्रास नक्कीच होतो पण समज यायला लागली की तो हे सर्व सहज स्वीकारतो. सावलीसारखी उपेक्षा त्याच्या सोबत व...

गंध ओल्या मातीचा

गंध ओल्या मातीचा गंध ओल्या मातीचा भिनतोय नसानसांत तुझ्या स्पर्शजाणिवा नकळत  आता आठवे क्षणाक्षणात गंध ओल्या मातीचा मी श्वास भरून घेतो मायभूची आठवण आणि हृदयी डोह भरून वाहतो गंध ओल्या मातीचा मज पुनपुन्हा उभारतो नशीबाचे आणिक घाव  झेलण्या बळ देतो गंध ओल्या मातीचा त्या गावा तू जाशील का? हरवले ते सवंगडी कुठे तू त्यांना बिलगून येशील का? मी माझा एकटा उद्विग्न सगळे कसे छिन्नविछिन्न अगा जीव थांबला घेता गंध ओल्या मातीचा कल्याणी (शुभदा)  २२/०६/२०१७

मी कोण?

 मी कोण? तुझा शेवटही मीच आणि आरंभही मीच  तुझ्या  जीवनास मिळाली  ती अवीट गोडीही  मीच  माझ्याच गर्भात असे  तुझ्या जीवनाचे बीज  घेशील श्वास शेवटचा निवांत  ती मायेची पृथाही असे मीच  माय नसता घरी दारी  बहिणीची होते ती आईही मीच  सखी सोबती मैत्रीण वा प्रेयसी  हृदयीची हाक ऐकते तीही मीच  तुज संगे  बांधिते जीवनगाठी  तुझ्याच विश्वात रमते ती मीच  सोडून सर्व भावविश्व आधीचे  नव्याने  संसार फुलवी तीही मीच  तिला वसाच दिला तो विधात्याने  प्रेम माया निर्माण नि समर्पण  अपमान छळ न व्हावा 'ति'चा  हीच एक आंतरिक तळमळ! - कल्याणी  ७ फेब्रु २०१७