Posts

ग्रीष्मा

**ग्रीष्मा** - कविता ? - नाही, हा तर माझ्याआठवणींचा हिंदोळा                         - शुभदा जगताप आपले हरवलेले दिवस, ते क्षण, आठवणीतील सख्या 'ती' ला ग्रीष्मातल्या सायंकाळी खूप खूप आठवतात. सख्या दूर गेल्या .... गेलेले क्षण परतणार नाहीत... मग गुजगोष्टी कराया तिला हीच ' ग्रीष्मा' सखी भावते .... जी दुसरी तिसरी कुणीही नसून ग्रीष्मातली सायंकाळ आहे .... चौथ्या कडव्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी - मी काही वर्षे आजोळी राहत होते (माझे वय तेव्हा ५-७ वर्षांचे असेल). नंतर कल्याणला आई बाबांकडे कायमची राहायला आल्यानंतर दरवर्षी न चुकता आख्खा उन्हाळा आजोळीच असू. त्या खेडेगावात धनगराचे कुटुंब होते ज्यातील 'भुंगरी ताई' दिवसभर शेळ्या मेंढ्या रानावनात नेत असे.... कधी हट्ट करुन मी ही तिच्यासोबत जाई ...कारण अनेक पायवाटा .... आतलं रान तिला माहिती होते आणि मला भटकंतीची व नवनवीन ठिकाणे - जास्त करून खेडेगावाकडची बघण्याची खूप उत्सुकता असायची जी तिच्यासोबतच्या पायी केलेल्या तंगडतोडीने पूर्ण व्ह्यायची. गावाबाहेरून एक नदी वाहायची.... विदर्भातील असल्या...

गे माय मराठी

गे माय मराठी माय मराठी वर  निस्सीम प्रेम करणाऱ्या ,माझ्या सारख्याच इतर ही जणांच्या मनीचा भाव या कवितेतून व्यक्त करण्याचा  एक छोटासा प्रयत्न.... आजच्या मराठी भाषा दिनी तुम्हा आंम्हा सर्वासाठी ..... या कवितेतही एक विशेष असे की प्रत्येक कडव्याची शेवटची ओळ तीन शब्द आणि ' र ' चे यमक जुळती झालेली आहे . *गे माय मराठी* गे माये तव ठाऊक माझीया मनाचा ठाव हृदयीचा आर्त आलाप तुजविण कोण जपणार? ||१|| कितीएक जणांनी कष्टाने तुज जपिले या लोकी पाया, भिंती झाले किती आनंदे कितीएक झिजणार ||२|| तुझीया कुशीत प्रथम हुंकर तुझीच अंगुली, माझी वाट आज मी चढतसे शिखरे यशाची  केवळ तुझ्याच अमृतपानावर ||३ || काय सांगू माझीया डोळा हर्ष जव पाहते तुज जपण्याची धडपड या इथे भारती अन विश्वात, खेळू तुझ्याच तालावर ||४ || नुरले आता प्रांत - देशी बंधन ध्वज मराठी उंच होतसे अन उत्स्फुर्त होऊनी तन  मन नाचे अखंड समुद्रापार ||५ || या आपण सगळेजण या मऱ्हाट देशी, आसमंतात वाजवू डंका ऊर भरून माय मराठी क्षितिजापार ||६ || कल्याणी (शुभदा जगताप) २७...

वाट

वाट माझी एक नवीन कविता... एक वेगळेपण आहे .... प्रत्येक कडव्यात पहिल्या ३ ओळीत ६ अक्षरे  शेवटच्या ओळीत ४ अक्षरे  पहिल्या कडव्याचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या कडव्याचा पहिला शब्द.... अशी रचना झालीये कवितेची.... पहा कशी वाटतेय ते  विषय:  त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी..... ( त्याला हे ठाऊक नाही) दिवास्वप्न पाहाते.... त्याच्याशी मनोमन संवाद साधते.... त्याच्या साठी झुरते आणि वास्तव माहिती असूनही त्याची च वाट पाहतेय.... अशी ही वेडी.... तिच्या भावना रेखाटण्याचा प्रयत्न.... वाट दिवस सरले  कुणी न उरले मी ही का हरले  आर्त हाक  हाक रे प्रितीची  तुझ्या ओळखीची  बिकट वाटेची  मनी माझ्या माझ्या तू अंगणी  नाचे मी गगनी  पिंगा रे घालूनी  बेत स्वप्नी  स्वप्नी ध्यानी मनी  ये तो रात्रंदिनी  परी दिनवाणी  मी रे प्रिया प्रिया तूच प्रिय  करु सांग काय  की मी होय प्रिय तुज दिठी   दिठी जी आस   का विनासायास न कळे, हा भास  ...

ती च्या वळणावर

ती च्या वळणावर आज सहजच वळलो ' ती ' च्या वळणावर खूप पुढे गेलो आणि आलो आपसूकच भानावर ' ती ' च वळणच तस होत खट्याळ धुंद सुगंधी आकर्षक कितीही थांबवू ( स्वतःला ) म्हटलं तरी वळायचेच पाय आपोआप तिथवर ' ती ' ने काय नाही पाहिल आमची टवाळी यारी दोस्ती भेटी भांडण अन मस्ती आणि कधी केलेली दुनियादारी ' ती ' च्या वळणाकडे वळत जायचो हात हातात घालून गप्पा टप्पा मौजमजा करत शेवट व्हायचा समाधानी पोटपूजेत पण मजेचे दिवस संपत गेले मित्र देशी परदेशी उडून गेले उरलेले आम्ही अडकलो लग्नबंधनी हाय! आता ' ती ' ची आठवण फक्त स्वप्नी मधूनच कधीतरी ' ती ' च वळण आठवत खूप खूप विनाकारण पण फिरकायचही नाही तिकड हे मला ' स्वामिनी ' च साकड तेलकट खाऊ नये म्हणते आमची 'ही ' हृदयाच्या धमन्या होतील ब्लौक खातो आजकाल उकडलेल अन पुचाट ' ती ' करते मात्र डोक्यात क्लौक क्लौक असे सरलेत किती वर्षे माहित नाही ठेवतय कोण हिशोब परवा मात्र दचकलोच ... कारण पोरग वळल होत ' ती ' च्याच वळणावर आज विचारांच्या तंद्रीत हरवलो होतो अन ' ...

स्वातंत्र्य- आपापले

स्वातंत्र्य  - आपापले  ' मला माझ  स्वातंत्र्य खूप प्रिय  आहे. कुठल्याही  परिस्थितीत कुठल्याही कारणासाठी आणि  मुळात कुणासाठीही मी ते गमावू शकत नाही. ' इथे 'मी ' म्हणजे कुणीही बर का! मनुष्य प्राणी , प्राणी , देश, जमात, विचार आणि बरच काही. सजीवांच  म्हणाल तर मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की स्वातंत्र्याची जाणीव ही सर्वात पहिले! त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनुष्य! तस प्राणी असो वा पक्षी , त्यांनाही स्वातंत्र्य प्रियच आहे.  मात्र, त्यांनी निसर्गाच्या नियमांच पालन अजूनही चालू  ठेवल्याने ' स्वातंत्र्य ' हां विषय असा  काही फार अधोरेखित होत नाही. पण ... पण  जेव्हा हां स्वार्थी मनुष्य स्वत:च्या मनोरंजनासाठी म्हणा  किंवा इतर काही हेतूने या प्राण्यांच्या आणि एकंदरीतच निसर्गाच्या जीवनचक्रात हस्तक्षेप करतो, तेव्हा खरा स्वातंत्र्यावर घाला घातला जातो त्यांच्या. मग आलंच, गरज नसताना संघर्ष आणि  पुढील विस्कळीतपणा, सगळ्याच गोष्टींचा! मनुष्य , मग स्त्री असो वा पुरुष, स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता. कधी कानी कपाळी ओरडून सांगतो तर कधी मूकप...

दिल की बातें

दिल की बातें गिला नही कोई किसीसे ना ही कोई शिकवा है बस अब मन भर सा गया है और दिल बहोत भारी भारी है| दोस्ती निभाने मे हम माहिर थे आज भी है और रहेंगे कल भी मगर मायने ही दोस्ती के बदले है कुछ इस कदर की दोस्त किसे कहे और किसे ना कहे यहा तक की दोस्ती भी करे या ना करे कुछ ऐसा संभ्रम है इस दिल मे| दोस्ती की तो छोडो बात प्यार की कुछ अलग नही दास्तान नाप तोलके जताया जाता है स्वार्थ दिखे तो मुस्कान भर छा जाता है और कुछ काम के ना बचे तुम तो एक नजर भर के मोहताज बन जाओ अब तो वो एहसास भी न देखने को मिले तो प्यार इस दुनिया से चला तो नही जायेगा कुछ ऐसा संभ्रम है इस दिल मे| दोस्ती प्यार अब बडी बडी बाते लगती है उससे भी जी उब जाये मगर ये क्या इंसानियत कीं भी बहोत कमी नजर आती है कुछ दो बाते अच्छी बताने जाओ तो आप सबसे पहले भीड से बाहर कुछ इस कदर पेश आते है अपने भी की कितनी बडी भूल कर बैठे हो तुम अब तो इंसान भी क्या जानवर से बढकर रहेंगे कुछ ऐसा संभ्रम है इस दिल मे| बातो बातो मे बात बिगड जाती है दोस्तो की याद तो मगर दिल मे रहती ही है प्यार की वो दास्ताने रह रहके याद त...

मृत्यूपंथ

मृत्यूपंथ जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला । परी शेवटी काळमुखी निमाला।। महाथोर ते मृत्यूपंथेची गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ।। समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या या श्लोकामध्येही आपल्या सर्वांच्याच जीवनातील एक अटळ आणि सत्य घटनेची आठवण करून दिलिये ती म्हणजे मृत्यू. आलेल्या प्रत्येकाला एके दिवशी मरणे आहेच. मग व्यर्थ चिंता कशाला? महाथोर, यशवंत, नावाजलेले आणि अगदी सामान्यातले सामान्य सुद्धा एक ना एक दिवस मरणारच आहे. मग फरक कुठे उरतो ? की तुम्ही जगलात कसे ?  बाबा (माझे सासरे श्री. बापूसाहेब जाधव ) चे निधन होऊन आता तीन महिने झालेत. शेवटच्या क्षणीचे  त्यांचे दर्शन अजून डोळ्यांसमोर ताजे आहे आणि ते आयुष्यभर राहील.  अतिशय शांत आणि समाधानी चेहरा, देह निपचित, अतिशांत झालेला. जणू अतिप्रेमाने थापटल्या नंतर बालकाला जशी मातेच्या मांडीवर झोप लागते आणि ते बालक त्या निद्रेचा मनापासून आनंद घेत असतो. अगदी तसच काहीतरी भासल त्यांच कलेवर बघून! फरक एवढाच की ही त्यांची शेवटची आणि चिरनिद्रा होती. मृत्यूपंथ हा शब्द कितीएक दिवस तरी मनात घोळत आहे. योगायोग असा की बाबांच्या ...