Posts

Showing posts from June, 2017

मी कोण?

 मी कोण? तुझा शेवटही मीच आणि आरंभही मीच  तुझ्या  जीवनास मिळाली  ती अवीट गोडीही  मीच  माझ्याच गर्भात असे  तुझ्या जीवनाचे बीज  घेशील श्वास शेवटचा निवांत  ती मायेची पृथाही असे मीच  माय नसता घरी दारी  बहिणीची होते ती आईही मीच  सखी सोबती मैत्रीण वा प्रेयसी  हृदयीची हाक ऐकते तीही मीच  तुज संगे  बांधिते जीवनगाठी  तुझ्याच विश्वात रमते ती मीच  सोडून सर्व भावविश्व आधीचे  नव्याने  संसार फुलवी तीही मीच  तिला वसाच दिला तो विधात्याने  प्रेम माया निर्माण नि समर्पण  अपमान छळ न व्हावा 'ति'चा  हीच एक आंतरिक तळमळ! - कल्याणी  ७ फेब्रु २०१७