Posts

पुस्तक परिचय - एक भाकर तीन चुली

 पुस्तकाचे नाव  -  एक भाकर तीन चुली     भाषा - मराठी    लेखकाचे नाव - श्री देवा झिंजाड   प्रकाशन    -   NEW ERA Publishing House   परिचय कर्ती   - शुभदा जगताप जाधव, सातारा.  शिव-शक्ती , मधील शक्ती हे स्त्रीचे रूप ...  शक्ती - शारीरीक, मानसिक की दोन्ही? ती जर शक्तीचं रूप आहे , तर मग सर्वात जास्त (तुलनेने) अन्याय-अत्याचार तिच्यावरच का होतात ?  आणि या सगळ्याला तोंड देत देत शेवटच्या श्वासापर्यंत मातृत्व टिकविण्याची तिची जी धडपड आहे, त्यात तिच्या सहनशक्तीचा कस लागतो, तर तिने तरी कुठवर धीर धरावा?  हे  असे  एक ना अनेक प्रश पडत राहतात, दोन्ही डोळ्यांना धारा लागतात आणि वाचतोय ते सर्वकाही आपल्या समोर घडत आहे परंतु आपण हतबल आहोत, काहीच करू शकत नाही; फक्त निमूटपणे ते बघत राहणे आणि हळहळ  व्यक्त करणे - ती सुद्धा मनातल्या मनातच.... एवढेच आपल्या हाती आहे ...  बाई -माणसाने किती तडजोडी कराव्या? नवरा मेल्यावर अशा गावात जिथे रूढी-परंपरांना अन्यन्यसाधारण महत्व आहे, तिने किती कष्ट उपसावे? तारुण्यात (त्या काळी - म्हणजे जवळपास ६०-७० वर्षांपूर्वी) तिने स्वतःचे शील जपण्यासाठी किती वेळा दुर्गा-आणि काली बनाव? आणि
जगणे म्हणजे काय हो? जगणे म्हणजे काय हो? तुम्हा आम्हा कळले का? प्रत्येकाची व्याख्या निराळी  समजून तरी उमगेल का?  एक म्हणे जीवन माझे  केले अर्पण दुसऱ्यांसाठी  समाधान असे त्यातच  काही ना ठेवले गाठी  एक म्हणतो जीवन जगणे  केवळ कलेच्या प्रेमापोटी  नाहीतर या दुष्ट जगती  आहे कोण माझे सोबती? एकाची तर तऱ्हा निराळी  म्हणतो मिथ्याच पसारा हा  जीवन देणारा तो बाप आपला  भेटेल का कधी या पामरा?? एकीने तर जीवन तिचे  केले समर्पित निरागसतेला  आईपण घेतले असे की  जीवनरस मिळाले हजारोंना  या सगळ्या आकृत्या  असे माझ्या आस पास  जगणे त्यांचे पाहूनी  गुपित कळतसे खास  जगणे म्हणजे काय हो? माझे माझ्यापुरते नसावे  विश्वात माझ्या अवघे सामावून परि क्षणात मी विलीन व्हावे  जगणे माझे जगणे आपले  सुंदर व्हावे सुगंधी व्हावे  प्रेम द्यावे प्रेम घ्यावे  अवघे जगणे सार्थकी लागावे  ---- कल्याणी (शुभदा जगताप) २९/७/२०२३, सातारा. 

मृदा

  मृदा .... मृद - माती गंध - वास ,/ सुवास मातीचा सुवास ... पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने रंध्रा - रंध्रांत भरणारा तो .... नाकपुड्या फुलून उर भरेस्तोवर घ्यावासा वाटत राहणारा .... मृदगंध !!   अवर्णनीय .... एक दोनदाच मिळतो ... पाऊस पूर्ण सुरू होण्याच्या अगदी सुरुवातीला ...   त्या पहिल्या पावसाच्या थेंबाचे तप्त धरणीत जे छोटे छोटे खड्डे पडतात ... त्यातून वाफ निघते आधी आणि मग ते पाण्याने भारतात .... आणि मग त्या सगळ्या पाण्याला ही मृदा     स्वतः त सामावून घेते ... तृप्त होते ... तिची सगळी पोकळी पूर्ण भरली की मग ते पाणी वर दिसत .. वाहू लागतं ... मृदेला त्याचं काही नसतं मग .... ती परिपूर्ण ... त्या पाण्याने ... शांत तृप्त समाधानी नवांकुर फुलवण्यासाठी सज्ज .... ही धरित्री ... मृदा ... दा म्हणजे देणारी ... कुठलीही अपेक्षा न ठेवता .... आपली काळी तांबडी आई ... मृदा .... तुला त्रिवार नमन 🙏🙏   कल्याणी ५ जून २०२३

The Sky is Clear….

Image
  The Sky is Clear….   The Sky is Clear and Blue There up high I see And with me Inside out So my soul and mind Today with a beautiful sunrise…..   I see liveliness….. A reflection of an energetic life All over the sky and earth The water so pure and flowing Like the life flows….   I see innocence…. A reflection of a pure soul In the wings of the butterflies And in smile of a child The breeze so gentle and pleasing Like the life pleases…..   I see love and Peace…. A reflection of being human In the temples, on the mountains And in everyone’s shining eyes The Trees so caring and giving Like the life gives….   I see joy and bliss A reflection of the Creator In very atom in every moment And in me and you The Universe so much embracing     Like the life embraces… The Sky today is So beautiful Blue and Clear So the thoughts…. So the life…   Kalyani (Shubhada Jagtap) 9 th June 2023

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

  आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न .....                                                       ----------- शुभदा जगताप   १९९१ साली मराठी रंगभूमीवर आलेलं " बंडखोर नाटक " चारचौघी पुन्हा एकदा नव्या कलाकारांसह अवतरलं आहे आणि ते पाहण्याचा योग काल आला . सातारा   शहरातील पहिल्याच प्रयोगाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला . संपूर्ण नाट्यगृह हाऊसफुल होतं आणि तीनही अंकात कमालीची शांतता होती प्रेक्षकांत . आजच्या झटपट च्या जमान्यात ३ अंकी नाटक रसिकांनी मन लावून पाहावं , त्यास दाद द्यावी , आणि तेही ३१ वर्षांपूर्वीच्या नाटकाला , काय कमाल आहे नाही ! लेखक प्रशांत दळवींच्या लेखणीची ताकद , दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीची दमदार हाताळणी , कलाकारांची हुकुमी टीम आणि सगळंच काही , अशी मस्त भट्टी फार क्वचित जमून येते .... ९१ साली अवघी १० वर्षांची असताना आई - वडील या नाटकाविषयी चर्चा करतानाचे अंधुकसे आठवते . नंतर वय आणि समजण्याइतकं शहाणपण वाढल्यावरही ह्या नाटकाचा उल्लेख जेव्हा जेव्हा कानी प
 मी पण न देगा देवा  'मी' पण न देगा देवा मी  कायमच आशावादी  सहसा  लवकर हार न मानणारा  जिद्द धैर्य बुद्धीची चुणूक  ही माझीच मापदंड! कायम वरचढ!! हो  अहंकार तर आहेच की   होताच  तो माझा दागिना मोठा  अगदी माझ्या निर्मितीपासूनच  मला चिटकलेला! गर्वाने मिरवलेला!! मग  मग काय मी उन्मत्त  इतर  माझ्यापुढे तुच्छ ही मग्रुरी  वाढला मग मनमानीपणा   मलाच नेणारा! माझ्याच अधोगतीकडे!! बुद्धी  गहाण ठेऊन प्रगती केली  प्रगती  म्हणतात खरे सगळेच  पण मनास माझ्या पक्के ठाऊक  विनाश अटळ! माझा स्वहस्ते!! कसा? शतकापूर्वी महामारी  आजही  तीच अवस्था आमची  नजरकैद आम्ही आमचेच  कोंडले श्वास!  जगणे भकास!! प्राणी  इतर ज्यांना तुच्छ मानिले  यातही  हिंडती मात्र स्वत्रंत  निसर्गाची उधळण सर्वत्र  आणि आम्ही! हतबल गात्र! आता  ठरविले एकच निर्धाराने  समान  दर्जा प्रत्येकाचा इथे  माणूस म्हणून आपणही थिटे  निसर्ग महान! गुरु आपुला!! येत्या  नवीन वर्षात सारासार विचार  केवळ  भौतिक आभासी जग नोहे  माणुसकी भूतदया हेचि दान   मोकळा श्वास! जोडू हात ....जोडू हात !! -कल्याणी (शुभदा जगताप) ३१ डिसेंबर २०२० टीप: सरत्या वर्षात मानवाला मिळालेला
 कविते....तू मज कवेत घे कविता.... तू मनातली आस  भावनांचे तरल चित्र  हृदयीची गुजगोष्ट नेत्रांचे अबोल कटाक्ष  कविता..... तू सखी अनमोल  कविता.... तू हळव्या मनाचा हुंकार  प्रतिभेचा जणू अविष्कार  सांजवेळी मिश्र किलबिल वेलींची सुगंधी कमान कविता.... तू सुमनांची आरास कविता..... तू अन्यायाचा विरोध गर्जत करिते उपहास  अधोरेखित विरोधाभास  नीतिमत्ता कर्तव्यकठोर कविता.... तू ढाल तलवार कविता.... तू संतांचे उपदेश समाज आरसा प्रतिबिंब निसर्ग अवकाश जपणूक भान -तत्व-माणूसपण कविता.... तू सृष्टीचा जीव कविता.... तू काल आज उद्याही न संपते तुझी निर्मिती संसार त्याग समाधान मोक्ष तुझ्यात सामावले अवघे विश्व् कविता..... तू निरंतर नित्य नूतन कविते.... मज तुझी नूतनता दे मज तुझी व्यापकता दे मज तुझी भावतरलता दे मज तुझ्यासम विहरु दे.... कविते.... गतजन्मीचे ऋणानुबंध आपुले विसरू नको याही जन्मातले तुजसाठी प्रसन्न सरस्वती मज अवघे अवकाश व्यापू दे.... कविते.... तू मज कवेत घे तू मज कवेत घे.... -कल्याणी (शुभदा जगताप) २१.०३.२०२१