कविते....तू मज कवेत घे


कविता....

तू मनातली आस 

भावनांचे तरल चित्र 

हृदयीची गुजगोष्ट

नेत्रांचे अबोल कटाक्ष 

कविता..... तू सखी अनमोल 


कविता....

तू हळव्या मनाचा हुंकार 

प्रतिभेचा जणू अविष्कार 

सांजवेळी मिश्र किलबिल

वेलींची सुगंधी कमान

कविता.... तू सुमनांची आरास


कविता.....

तू अन्यायाचा विरोध

गर्जत करिते उपहास 

अधोरेखित विरोधाभास 

नीतिमत्ता कर्तव्यकठोर

कविता.... तू ढाल तलवार


कविता....

तू संतांचे उपदेश

समाज आरसा प्रतिबिंब

निसर्ग अवकाश जपणूक

भान -तत्व-माणूसपण

कविता.... तू सृष्टीचा जीव


कविता....

तू काल आज उद्याही

न संपते तुझी निर्मिती

संसार त्याग समाधान मोक्ष

तुझ्यात सामावले अवघे विश्व्

कविता..... तू निरंतर नित्य नूतन


कविते....

मज तुझी नूतनता दे

मज तुझी व्यापकता दे

मज तुझी भावतरलता दे

मज तुझ्यासम विहरु दे....


कविते....

गतजन्मीचे ऋणानुबंध आपुले

विसरू नको याही जन्मातले

तुजसाठी प्रसन्न सरस्वती

मज अवघे अवकाश व्यापू दे....


कविते.... तू मज कवेत घे

तू मज कवेत घे....



-कल्याणी (शुभदा जगताप)

२१.०३.२०२१

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

सहावी दुर्गा - पद्मजा