जगणे म्हणजे काय हो?


जगणे म्हणजे काय हो?

तुम्हा आम्हा कळले का?

प्रत्येकाची व्याख्या निराळी 

समजून तरी उमगेल का? 


एक म्हणे जीवन माझे 

केले अर्पण दुसऱ्यांसाठी 

समाधान असे त्यातच 

काही ना ठेवले गाठी 


एक म्हणतो जीवन जगणे 

केवळ कलेच्या प्रेमापोटी 

नाहीतर या दुष्ट जगती 

आहे कोण माझे सोबती?


एकाची तर तऱ्हा निराळी 

म्हणतो मिथ्याच पसारा हा 

जीवन देणारा तो बाप आपला 

भेटेल का कधी या पामरा??


एकीने तर जीवन तिचे 

केले समर्पित निरागसतेला 

आईपण घेतले असे की 

जीवनरस मिळाले हजारोंना 


या सगळ्या आकृत्या 

असे माझ्या आस पास 

जगणे त्यांचे पाहूनी 

गुपित कळतसे खास 


जगणे म्हणजे काय हो?

माझे माझ्यापुरते नसावे 

विश्वात माझ्या अवघे सामावून

परि क्षणात मी विलीन व्हावे 


जगणे माझे जगणे आपले 

सुंदर व्हावे सुगंधी व्हावे 

प्रेम द्यावे प्रेम घ्यावे 

अवघे जगणे सार्थकी लागावे 


---- कल्याणी (शुभदा जगताप)

२९/७/२०२३, सातारा. 

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

सहावी दुर्गा - पद्मजा