मृदा

 

मृदा....

मृद - माती

गंध - वास ,/ सुवास

मातीचा सुवास...

पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने रंध्रा-रंध्रांत भरणारा तो.... नाकपुड्या फुलून उर भरेस्तोवर घ्यावासा वाटत राहणारा.... मृदगंध!!

 अवर्णनीय.... एक दोनदाच मिळतो... पाऊस पूर्ण सुरू होण्याच्या अगदी सुरुवातीला ...

 

त्या पहिल्या पावसाच्या थेंबाचे तप्त धरणीत जे छोटे छोटे खड्डे पडतात... त्यातून वाफ निघते आधी आणि मग ते पाण्याने भारतात....आणि मग त्या सगळ्या पाण्याला ही मृदा    स्वतः सामावून घेते... तृप्त होते... तिची सगळी पोकळी पूर्ण भरली की मग ते पाणी वर दिसत .. वाहू लागतं...

मृदेला त्याचं काही नसतं मग....

ती परिपूर्ण...त्या पाण्याने ...

शांत

तृप्त

समाधानी

नवांकुर फुलवण्यासाठी सज्ज ....

ही धरित्री ...मृदा...

दा म्हणजे देणारी ... कुठलीही अपेक्षा ठेवता....

आपली काळी तांबडी आई ...

मृदा....

तुला त्रिवार नमन 🙏🙏

 

कल्याणी

जून २०२३

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

सहावी दुर्गा - पद्मजा