Posts

Showing posts from October, 2017

प्रेम

प्रेम... प्रेम - विषयच मोठा गहन आहे. गहन का तर किती एक जणानी आजपर्यंत ह्या विषयावर खोलवर विचार केला, मांडला, व्याखेत बसविण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही ' प्रेम म्हणजे नक्की काय असत हो?' अस विचारणारे कायमच आहेत आणि विचारणार्यांची संख्या कधी कमी झालेली नाही. तुम्ही आम्ही , बहुतेक सर्वांनीच प्रेम कधी ना कधी, कुठे ना कुठे अनुभवलेल आहेच. पण मग तरीही नक्की प्रेम काय असत याची पूर्णपणे उकल झालेली व्यक्ती अजून तरी बघण्यात नाही. प्रेमाचे पैलूच तितके विविधरंगी आणि नात्यानुसार बदलत जाणार त्याच स्वरूप! लहान मुले आई दिसली नाही की सैरभैर होतात आणि उलटपक्षी आई चीही अवस्था तिच. प्रेमाची खूप जास्त उत्कटता अनुभवता येते या नात्यात. पण तिच मुले मोठी झाली की त्यांच जग वेगळ आणि प्रेमाच वेगळ रुप मित्र मैत्रिणी,  शिक्षक, कामातले सहकारी, प्रियकर/ प्रेयसी, नवरा /बायको या टप्प्यांत अनुभवास येत. आई ही तिच संपूर्ण विश्वच जणू असणार ते मूल जगात स्वछंद विहार करण्यास आपल्या बंधनातून मुक्त करते. या टप्प्यावर तिच प्रेम कमी नाही उलट वाढलेलच असत पण काहीस अव्यक्त स्वरुपात! तिच्या नकळतच प्रेम काळजीत बदलत! श्री