Posts

Showing posts from November, 2018

वाट

वाट माझी एक नवीन कविता... एक वेगळेपण आहे .... प्रत्येक कडव्यात पहिल्या ३ ओळीत ६ अक्षरे  शेवटच्या ओळीत ४ अक्षरे  पहिल्या कडव्याचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या कडव्याचा पहिला शब्द.... अशी रचना झालीये कवितेची.... पहा कशी वाटतेय ते  विषय:  त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी..... ( त्याला हे ठाऊक नाही) दिवास्वप्न पाहाते.... त्याच्याशी मनोमन संवाद साधते.... त्याच्या साठी झुरते आणि वास्तव माहिती असूनही त्याची च वाट पाहतेय.... अशी ही वेडी.... तिच्या भावना रेखाटण्याचा प्रयत्न.... वाट दिवस सरले  कुणी न उरले मी ही का हरले  आर्त हाक  हाक रे प्रितीची  तुझ्या ओळखीची  बिकट वाटेची  मनी माझ्या माझ्या तू अंगणी  नाचे मी गगनी  पिंगा रे घालूनी  बेत स्वप्नी  स्वप्नी ध्यानी मनी  ये तो रात्रंदिनी  परी दिनवाणी  मी रे प्रिया प्रिया तूच प्रिय  करु सांग काय  की मी होय प्रिय तुज दिठी   दिठी जी आस   का विनासायास न कळे, हा भास  माझा मला  मला नाही जरी  भेटलास तरी  वाट याच तिरी  पाहीन रे  कल्याणी ( शुभदा)  १७/११/२०१८