Posts

Showing posts from July, 2017

गंध ओल्या मातीचा

गंध ओल्या मातीचा गंध ओल्या मातीचा भिनतोय नसानसांत तुझ्या स्पर्शजाणिवा नकळत  आता आठवे क्षणाक्षणात गंध ओल्या मातीचा मी श्वास भरून घेतो मायभूची आठवण आणि हृदयी डोह भरून वाहतो गंध ओल्या मातीचा मज पुनपुन्हा उभारतो नशीबाचे आणिक घाव  झेलण्या बळ देतो गंध ओल्या मातीचा त्या गावा तू जाशील का? हरवले ते सवंगडी कुठे तू त्यांना बिलगून येशील का? मी माझा एकटा उद्विग्न सगळे कसे छिन्नविछिन्न अगा जीव थांबला घेता गंध ओल्या मातीचा कल्याणी (शुभदा)  २२/०६/२०१७