गंध ओल्या मातीचा

गंध ओल्या मातीचा

गंध ओल्या मातीचा
भिनतोय नसानसांत
तुझ्या स्पर्शजाणिवा नकळत 
आता आठवे क्षणाक्षणात

गंध ओल्या मातीचा
मी श्वास भरून घेतो
मायभूची आठवण आणि
हृदयी डोह भरून वाहतो

गंध ओल्या मातीचा
मज पुनपुन्हा उभारतो
नशीबाचे आणिक घाव 
झेलण्या बळ देतो

गंध ओल्या मातीचा
त्या गावा तू जाशील का?
हरवले ते सवंगडी कुठे
तू त्यांना बिलगून येशील का?

मी माझा एकटा उद्विग्न
सगळे कसे छिन्नविछिन्न
अगा जीव थांबला घेता
गंध ओल्या मातीचा

कल्याणी (शुभदा) 
२२/०६/२०१७

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य