थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य

 

थोडक्यात ..... थोडस काहीतरी ....

 

८. असामान्यातली सामान्य

                                    --- शुभदा जगताप

 

नुकताच ऍमेझॉन प्राइम वर शकुंतला देवी हा चित्रपट पाहिला. नेहमीप्रमाणेच विद्या बालन ने अभिनय कशास म्हणावं हे दाखवून दिलय. कथा भन्नाट आणि तेवढीच अचंबित करणारी. एकीच्या जीवनावर आधारित आणि हिरो म्हणाल तर आपली एक भारतीय स्त्री ब्रिटिश काळात जन्मलेली  (एकुणातच) त्यावेळच्या मानाने क्रान्तिकारी विचारांची. माझ्याप्रमाणेच कित्येक भारतीय नव्या - जुन्या पिढितल्याना जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व कळण्यास याने हातभार लाभेल यात शंका नाही! हया कोण देवी आहेत की ज्यांच्यावर एक चित्रपट निघावानिदान या उत्सुकसतेपोटी जरी गूगल सर्च केलेत तर निव्वळ तोंडात बोट घालण्यासारखे काहीतरी नवीन कळेल आणि त्याही पुढे जाऊन  चित्रपट पाहिलात तर दोन तास नक्कीच वाया जाणार नाहीतयाची हमखास खात्री!

 जगभरात " ह्यूमन कॉम्पुटर" या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शकुंतला देवी यांचा जन्म एका कन्नड ब्राह्मण कुटुंबात १९२९ साली कर्नाटक येथे झाला. आपल्या मुलीमध्ये अंकांना समजून घेऊन कितीही कठीण गणिते सोडविण्याची एक अदभूत नैसर्गिक देणगी आहेहे त्यांच्या वडिलांना त्या साधारण ४-५ वर्षांच्या असतानाच कळले. मग त्यांचे मॅथ्स शोज ठिकठिकाणी करणे आणि त्यातून मिळणारी बक्षिसाची रक्कमहे शकुंतला देवींसाठी नित्याचे झालेले. पण त्यामुळे लहान मुलांच्या वाट्याला येणार सामान्य जीवनशाळा इत्यादी ज्यात मुलांना खूप आनंद मिळतोते कधी आले नाही. असामान्यत्व सांभाळणं त्या छोट्या जीवाला नक्कीच जड गेलं असणार. पण हळूहळू त्याची ही सवय झाली. धड १० वी पर्यंत ही शिक्षण न घेऊ शकलेलीसाडीत आणि पारंपारिक दक्षिण भारतीय पेहरावात वावरणाऱ्या स्त्रीच असामान्यत्व जगापासून लपून राहील नाही आणि world famous mathematician हा किताब लवकरच त्यांच्या नावे जमा झाला. रुपेरी पडद्यावर त्यांचा हा प्रवास बघणे खरंच एक वेगळा अनुभव आहे. The world of homosexuals, Perfect murder, Astrology for you, More puzzles to puzzle you....... या आणि अजून बऱ्याच पुस्तकांच्या त्या लेखिका देखील आहेत. अशी व्यक्ती नक्कीच अत्यंत प्रतिभाशाली असावी यात शंका उरत नाही. केवळ अचंबित करणारी दैवी देणगीच त्यांना मिळालेली.  

 

शकुंतला देवी १९४४ मध्ये लंडनला गेल्या. लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले. १९७६ साली आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करुन त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली. इ.स. १९७७ मध्ये डलास विद्यापीठात शकुंतलाचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद काॅम्प्यूटर 'युनिव्हॅकशी झाला. तेथे शकुंतलादेवीने एका २०१ अंकी संख्येचे २३वे मूळ ५० सेकंदात काढले व फळ्यावर लिहिले. हे मूळ काढायला काॅम्प्यूटरला ६२ सेकंद लागले. १८ जून १९८० मध्ये त्यांना ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ ह्या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले .त्यानंतर शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करुन दाखवत केवळ २८ सेकंदामध्ये १८९४७६६८१७७९९५४२६४६२७७३७३० हे उत्तर दिल. विचार करा १३ आकडी दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त २८ सेकंदात पूर्ण केला. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि शकुंतला देवी याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये विराजमान झाल.

खरतर शकुंतलादेवी यांच्या अंगी एक अदभूत प्रतिभा होती की अख्ख्या भारतास त्याची दाखल घ्यावी लागली .चक्क गुगल ने त्यांच्या पहिल्या जयंतनिमित्त डुडल बनवुन त्यांना आदरांजली वाहिली होती. भारतात परतल्यावर १९८८ मध्ये त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलीफोर्निया विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागाचं विशेष आमंत्रण आलं.या विभागातील प्रा.आर्थर जेनसन यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. प्रा.आर्थर जेनसन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले.कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येच घनमूळ काढणे किवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा सातवा किवा आठवा घात काढायला सांगण्याची खोटी की शकुंतला देवी याचं उत्तर हजर असायचं." (हा परिच्छेद विकिपीडिया मधून साभार! आणि हे सर्व महत्वाचे प्रसंग चित्रपटात दाखवले आहेत हे विशेष. )

 

पण कितीही मोठी झालेली असली किंवा नावलौकिक प्राप्त झाला असला तरीही सामान्यपणे एका स्त्रीच्या ज्या नैसर्गिक भाव-भावना असतात तशा त्यांच्या ही होत्या आणि प्रेम करणारा जोडीदार मिळावाआपण ही आई व्हावं या इच्छा त्याच्या ही होत्या. नशिबाने त्या पूर्ण ही झाल्या. पण समाजाने परंपरेनुसार आखून दिलेल्या चौकटीत बसणारी ती काही एक सर्वसामान्य स्त्री नव्हती. अंकमजेदार कोडी त्यांना खुणावत होती सतत. 'अंक आणि गणितावर जेवढं प्रेम करतेस तेव्हढच माझयावर एक साधी आई म्हणून करू शकत नाहीस का', हा मुलीचा प्रश्न मात्र जिव्हारी लागतो आणि मग सगळं सोडून फक्त एक आई म्हणून जगण्याचं त्या ठरवतात. स्वतःची ओळखच आपण विसरून जातोयपण त्या बदल्यात मुलगी खुश आहे नाहा विचार व मानसिक द्वंद फार अप्रतिमरीत्या सादर केलय  चित्रपटात.

 

 खर तर कुठलीही आई परफेक्ट नसतेसतत काहीतरी शिकत असते आणि आपल्या लेकरांवर जीवापाड प्रेम करत असतेहे स्वतः आई झाल्याशिवाय कळत नाही बुवा! माझा तर हाच अनुभव आहे. लहान भावावरच तू जास्त प्रेम करतेस माझयावर नाहीअस नेहमी बोलणारी मीपण लग्नानंतर आणि मुख्यत्वे करून आई झाल्यानंतरच माझया आईची भूमिका समजू शकले. आणि हा अनुभव शकुंतला देवी चित्रपट पाहताना माझ्यासारख्याच असंख्य आयांना आल्याशिवाय राहणार नाही. आज मातृदिनश्रावण महिन्यातील अमावास्या. त्यानिमित्त जन्मदात्या आईला आणि या मायभुलाही त्रिवार वंदन. यांचे पांग कधी फेडता यायचे नाही. त्यामुळे आई आणि वडीलदोघेही जिवंत असतानाच त्यांची काय ती सेवा करायला मिळाली तर भाग्य समावे आपले. नंतर चुकीच्या वागण्याचा पश्चाताप करून काय उपयोगअसो!

 एका आईची तगमग आणि एका असामान्य स्त्रीच सामान्य जगणं (केविलवाणा प्रयत्न म्हणायला हव खर तर)हे पाहून हृद्य गलबलल नाही तरच नवल! पुरस्कार स्वीकारताना आई ला फक्त आई म्हणूनच पाहू नका तर तीची स्वतःची एक अशी वेगळी ओळख असू शकते हे स्वीकारा आणि तटस्थपणे एक व्यक्ती म्हणून तिच्याकडे पाहायला शिका ', हे जेव्हा त्या बोलताततेव्हा खरंच हा विचार आपण कधी करतच नाही हे जाणवतं. कळत पण वळत नाहीअशातली गोष्ट आहे ही!

 तर लेखाच्या शेवटी सांगावस वाटत की अशा EXTRAORDINARY व्यक्तींच्या जीवनावावर आधारित चित्रपट बनविले तर ते नकीच स्वागतार्ह आहे. कारण माहिती वाचून आपण कधीतरी ती विसरतोच. परंतु दृक्श्राव्य माध्यम हे अत्यंत प्रभावी असलयाने त्यात पाहिलेलं किंवा एखाद व्यक्तिमत्व चित्रण आपण सहसा विसरू शकणार नाही. या भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे जे कुणी लढले तेही काळाच्या विस्मृतीत कधी जाऊ नयेआणि असंख्य UNKNOWN  UNSUNG HEROS (अनेक क्षेत्रांतील) असेच पडद्यावर येत राहोत या सदिच्छासह पुन्हा एकदा आवर्जून सांगते की एकदा तरी हा चित्रपट बघण्यालायक आहे. वेळ वाया जाणार नाहीहा स्वानुभव !

 

-कल्याणी (शुभदा जगताप)

१८ ऑगस्ट २०२०

 

हे नक्की पहा:

1.       https://www.youtube.com/watch?v=MGBTHb0FigI

2.       https://www.youtube.com/watch?v=rM-Jt1Cv_0Q

3.       https://www.youtube.com/watch?v=kqG8dOhAE1A

4.       https://www.youtube.com/watch?v=8HA1HRufYso

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

सहावी दुर्गा - पद्मजा