Posts

Showing posts from November, 2017

मृत्यूपंथ

मृत्यूपंथ जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला । परी शेवटी काळमुखी निमाला।। महाथोर ते मृत्यूपंथेची गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ।। समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या या श्लोकामध्येही आपल्या सर्वांच्याच जीवनातील एक अटळ आणि सत्य घटनेची आठवण करून दिलिये ती म्हणजे मृत्यू. आलेल्या प्रत्येकाला एके दिवशी मरणे आहेच. मग व्यर्थ चिंता कशाला? महाथोर, यशवंत, नावाजलेले आणि अगदी सामान्यातले सामान्य सुद्धा एक ना एक दिवस मरणारच आहे. मग फरक कुठे उरतो ? की तुम्ही जगलात कसे ?  बाबा (माझे सासरे श्री. बापूसाहेब जाधव ) चे निधन होऊन आता तीन महिने झालेत. शेवटच्या क्षणीचे  त्यांचे दर्शन अजून डोळ्यांसमोर ताजे आहे आणि ते आयुष्यभर राहील.  अतिशय शांत आणि समाधानी चेहरा, देह निपचित, अतिशांत झालेला. जणू अतिप्रेमाने थापटल्या नंतर बालकाला जशी मातेच्या मांडीवर झोप लागते आणि ते बालक त्या निद्रेचा मनापासून आनंद घेत असतो. अगदी तसच काहीतरी भासल त्यांच कलेवर बघून! फरक एवढाच की ही त्यांची शेवटची आणि चिरनिद्रा होती. मृत्यूपंथ हा शब्द कितीएक दिवस तरी मनात घोळत आहे. योगायोग असा की बाबांच्या निधना आधी काही दिवस