Posts

Showing posts from June, 2018

स्वातंत्र्य- आपापले

स्वातंत्र्य  - आपापले  ' मला माझ  स्वातंत्र्य खूप प्रिय  आहे. कुठल्याही  परिस्थितीत कुठल्याही कारणासाठी आणि  मुळात कुणासाठीही मी ते गमावू शकत नाही. ' इथे 'मी ' म्हणजे कुणीही बर का! मनुष्य प्राणी , प्राणी , देश, जमात, विचार आणि बरच काही. सजीवांच  म्हणाल तर मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की स्वातंत्र्याची जाणीव ही सर्वात पहिले! त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनुष्य! तस प्राणी असो वा पक्षी , त्यांनाही स्वातंत्र्य प्रियच आहे.  मात्र, त्यांनी निसर्गाच्या नियमांच पालन अजूनही चालू  ठेवल्याने ' स्वातंत्र्य ' हां विषय असा  काही फार अधोरेखित होत नाही. पण ... पण  जेव्हा हां स्वार्थी मनुष्य स्वत:च्या मनोरंजनासाठी म्हणा  किंवा इतर काही हेतूने या प्राण्यांच्या आणि एकंदरीतच निसर्गाच्या जीवनचक्रात हस्तक्षेप करतो, तेव्हा खरा स्वातंत्र्यावर घाला घातला जातो त्यांच्या. मग आलंच, गरज नसताना संघर्ष आणि  पुढील विस्कळीतपणा, सगळ्याच गोष्टींचा! मनुष्य , मग स्त्री असो वा पुरुष, स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता. कधी कानी कपाळी ओरडून सांगतो तर कधी मूकपणेच, पण मिळवतो मात्र नक्की. ३००-३५० वर्षांपूर्वी &