Posts

Showing posts from July, 2018

ती च्या वळणावर

ती च्या वळणावर आज सहजच वळलो ' ती ' च्या वळणावर खूप पुढे गेलो आणि आलो आपसूकच भानावर ' ती ' च वळणच तस होत खट्याळ धुंद सुगंधी आकर्षक कितीही थांबवू ( स्वतःला ) म्हटलं तरी वळायचेच पाय आपोआप तिथवर ' ती ' ने काय नाही पाहिल आमची टवाळी यारी दोस्ती भेटी भांडण अन मस्ती आणि कधी केलेली दुनियादारी ' ती ' च्या वळणाकडे वळत जायचो हात हातात घालून गप्पा टप्पा मौजमजा करत शेवट व्हायचा समाधानी पोटपूजेत पण मजेचे दिवस संपत गेले मित्र देशी परदेशी उडून गेले उरलेले आम्ही अडकलो लग्नबंधनी हाय! आता ' ती ' ची आठवण फक्त स्वप्नी मधूनच कधीतरी ' ती ' च वळण आठवत खूप खूप विनाकारण पण फिरकायचही नाही तिकड हे मला ' स्वामिनी ' च साकड तेलकट खाऊ नये म्हणते आमची 'ही ' हृदयाच्या धमन्या होतील ब्लौक खातो आजकाल उकडलेल अन पुचाट ' ती ' करते मात्र डोक्यात क्लौक क्लौक असे सरलेत किती वर्षे माहित नाही ठेवतय कोण हिशोब परवा मात्र दचकलोच ... कारण पोरग वळल होत ' ती ' च्याच वळणावर आज विचारांच्या तंद्रीत हरवलो होतो अन '