Posts

Showing posts from May, 2019

ग्रीष्मा

**ग्रीष्मा** - कविता ? - नाही, हा तर माझ्याआठवणींचा हिंदोळा                         - शुभदा जगताप आपले हरवलेले दिवस, ते क्षण, आठवणीतील सख्या 'ती' ला ग्रीष्मातल्या सायंकाळी खूप खूप आठवतात. सख्या दूर गेल्या .... गेलेले क्षण परतणार नाहीत... मग गुजगोष्टी कराया तिला हीच ' ग्रीष्मा' सखी भावते .... जी दुसरी तिसरी कुणीही नसून ग्रीष्मातली सायंकाळ आहे .... चौथ्या कडव्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी - मी काही वर्षे आजोळी राहत होते (माझे वय तेव्हा ५-७ वर्षांचे असेल). नंतर कल्याणला आई बाबांकडे कायमची राहायला आल्यानंतर दरवर्षी न चुकता आख्खा उन्हाळा आजोळीच असू. त्या खेडेगावात धनगराचे कुटुंब होते ज्यातील 'भुंगरी ताई' दिवसभर शेळ्या मेंढ्या रानावनात नेत असे.... कधी हट्ट करुन मी ही तिच्यासोबत जाई ...कारण अनेक पायवाटा .... आतलं रान तिला माहिती होते आणि मला भटकंतीची व नवनवीन ठिकाणे - जास्त करून खेडेगावाकडची बघण्याची खूप उत्सुकता असायची जी तिच्यासोबतच्या पायी केलेल्या तंगडतोडीने पूर्ण व्ह्यायची. गावाबाहेरून एक नदी वाहायची.... विदर्भातील असल्याने ती मार्च च्या जवळपासच कोरडीठण पड