Posts

Showing posts from March, 2020
परजीवी (Parasite - a  Korean movie ) भन्नाट कथा काय असते आणि त्या कथेला पडद्यावर तितक्याच अफलातून प्रकारे दिग्दर्शन करून सादर करणे काय प्रकार असतो, ते हा कोरियन चित्रपट पॅरासाइट पाहून अनुभवले. सुरुवातीला कॉमेडी असावा असे वाटून आपण चित्रपट बघतो, हसवतोही तो आपल्याला आणि नकळतपणे तो समाजातील भयानक दरीच्या (जी गरीब श्रेमंतांमधील आहे) प्रश्नाला कधी स्पर्श करतो ते कळतही नाही. २०१९ च्या कान्स फिल्म फेस्टिवल ला Palme d'Or या सर्वोच्च पुरस्काराचा मानकरी ठरलेला आणि अजून अनेक पुरस्कारानी सन्मानित हा चित्रपट सध्या आपल्या चित्रपटगृहात इंग्लिश सबटायटल्स सोबत दाखवला जातोय. एक अप्रतिम कलाकृती बघण्याची संधी चित्रपट रसिकांनी गमावू नये असे मला वाटते. दक्षिण कोरियन दिग्दर्शक बॉन्ग ज्यून-हो याचा हा चित्रपट म्हणजे समाजातील भयानक वास्तव - जे गरिबी आहे त्यावर बेमालूमपणे फटके ओढणारी एक उत्कृष्ट कलाकृती आहे. एकीकडे हातात काम नसल्याने रोजच्या जेवणाची ही मारामारी असलेल चौकोनी कुटुंब, तर दुसरीकडे एक गर्भश्रीमंत कुटुंब व स्वतःचे घरगुती प्रश्न आणि त्यांचा गरीब लोकांसाठीचा दृष्टिकोन व विचार, या मध्यवर्ती कथानकाभो