Posts

Showing posts from July, 2020

थोडक्यात ..... थोडस काहीतरी ....७. स्वीकार आणि सकारात्मकता ....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ७. स्वीकार आणि सकारात्मकता .... - शुभदा जगताप एका गुणी कलाकाराच्या अकाली निधनाने मागील संपूर्ण आठवडा लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांनी भरून होता. तस बघायला गेलं तर आपले खरे हिरो हे आपल्या सीमेवर तैनात आहेत, जे प्राण हातात घेऊनच लढण्यास व देशाच्या म्हणजेच तुम्हा आम्हा सारख्याच्या संरक्षणार्थ तिथे उभे आहेत. ते किती, कसे व कुणाशी लढताना हे जग सोडून जातात त्याची चर्चा फार कमी किंवा होतच नाही. मात्र चित्रपट आणि त्यातील कलाकार हे दृक्श्राव्य माध्यमातून आपल्या जीवनाचा/ विचारांचा खूप मोठा भाग व्यापतात व हेच खर जग व हेच खरे हिरो असा काहीसा समज तरुणाई किंवा एकंदर सर्वच जण करून घेतात, अस बरेच वेळा अशा काही घटना घडल्या की पुनःपुन्हा प्रत्ययास येत. अस मुळीच नाही की त्या व्यक्तीच्या निधनाचे दुःख नाही, दुःख आहेच, एक गुणी कलाकार समाजाने गमावला आहे. आणि कुठल्या मानसिक युद्धातून ती व्यक्ती जात होती ते आपण नाही समजू शकत, त्यामुळे त्याने अस किंवा तस करायला हवं होतं, अस म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही. पण मुळातच आत्महत्या किंवा अशाच एका आवेगाच्या (अ)विचाराने स्वतःचे ज