थोडक्यात ..... थोडस काहीतरी ....७. स्वीकार आणि सकारात्मकता ....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी ....
७. स्वीकार आणि सकारात्मकता ....
- शुभदा जगताप
एका गुणी कलाकाराच्या अकाली निधनाने मागील संपूर्ण आठवडा लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांनी भरून होता. तस बघायला गेलं तर आपले खरे हिरो हे आपल्या सीमेवर तैनात आहेत, जे प्राण हातात घेऊनच लढण्यास व देशाच्या म्हणजेच तुम्हा आम्हा सारख्याच्या संरक्षणार्थ तिथे उभे आहेत. ते किती, कसे व कुणाशी लढताना हे जग सोडून जातात त्याची चर्चा फार कमी किंवा होतच नाही. मात्र चित्रपट आणि त्यातील कलाकार हे दृक्श्राव्य माध्यमातून आपल्या जीवनाचा/ विचारांचा खूप मोठा भाग व्यापतात व हेच खर जग व हेच खरे हिरो असा काहीसा समज तरुणाई किंवा एकंदर सर्वच जण करून घेतात, अस बरेच वेळा अशा काही घटना घडल्या की पुनःपुन्हा प्रत्ययास येत. अस मुळीच नाही की त्या व्यक्तीच्या निधनाचे दुःख नाही, दुःख आहेच, एक गुणी कलाकार समाजाने गमावला आहे. आणि कुठल्या मानसिक युद्धातून ती व्यक्ती जात होती ते आपण नाही समजू शकत, त्यामुळे त्याने अस किंवा तस करायला हवं होतं, अस म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही. पण मुळातच आत्महत्या किंवा अशाच एका आवेगाच्या (अ)विचाराने स्वतःचे जीवन संपविणे हाच एकमेव पर्याय उरतो का? पुन्हा एकीकडे हे ही लक्षात घेतलं पाहिजे की या अशा घटनांमधून / कृतींमधून तरुणाईला काय संदेश जातो? नाही सहन होत किंवा लढायचं नाही म्हणून सरळ एक्सिटच घ्यायची? मागे असणारे मित्र, परिवार यांचं काय होत असेल हा विचार एकदा तरी मनात यावा.
कोरोनामुळे आलेली परिस्थिती व त्याचे जागतिक स्तरावर झालेले परिणाम आपण सर्वच उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत. अगदी हातावर पोट असणाऱ्याचं काय झालं असेल हा विचारही अस्वस्थ करतो. स्ट्रेस काय फक्त एका ठराविक क्षेत्रात काम करणाऱ्यालाच असतो का? ताण कुणालाही येतो, अगदी लहान मुलांनासुद्धा! पण मग ह्या ताणाने इतकं ताणून जाऊन जमेल का? अशा कितीतरी छोट्या मोठ्या कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे या महामारीमुळे काम नाही आणि असेल तर ते उरकायला पुरेशी माणसे नाहीत. काहींच्या नोकऱ्या गेल्या, ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून होत. मग अशा वेळी हार मानून निराशेच्या गर्तेत स्वतःला ढकलून द्यायचं की काही पर्याय शोधायचे आणि सकारात्मकता टिकवून ठेवायची हे आपलं आपल्यालाच करावं लागत. नसेल जमत तर जवळच्या कुणाशी बोलून मन मोकळं करून मार्ग शोधू शकतो. विचारांची व मानसिक पाठिंब्याची मदत मागण्यास लाज नको, कारण जीवन अमुल्य आहे. पुन्हा पुन्हा मिळणार नाही. सध्याच्या परिस्थितीचे चटके सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात बसणारच आहेत. आणि ही परिस्थिती निवळली तरी रोजच्या जीवनातले चढ - उतार व त्यातून येणारे निराशेचे प्रसंग आहेतच, आपल्या सर्वांच्याच जीवनाचा तो एक भाग आहे. पण त्यातूनही कसा मार्ग काढून तरुन जायचं, हाच विचार आपल्या सर्वांना पुढे नेत राहील, नाही का?
याच सर्व विचारांत काही ओळी कागदावर उतरवल्या आहेत, हिंदी भाषा निवडली. यातून कुणाला काही उपदेश करण्याचा मानस नाही, खर तर स्वतःलाच पुन्हा एकदा - हे जीवन किती अमूल्य भेट आहे त्या नियंत्याची, याची आठवण करून द्यावीशी वाटली. आजूबाजूला अनेक अशा घटना घडत राहतात ज्यायोगे नाही म्हटलं तरी नकळत नकारात्मकता जाणवते. अशा वेळी - तूच तुझा मदतगार, हे लक्षात येत!

स्वीकार
दुनिया की इस भरी भीड मे
मन तो हमेशा ढुंढता है
दिल की आवाज सुननेवाला दिल
मन की तडपन समझनेवाला मन
पर उपरी चकाचौन में भूलभुलैय्या दिनरात
दिल और मन दोनों चुप्पी में गुमनाम।
ऐसे में किससे करे साँझा
तु ही खुदका दोस्त अब बन जा
न रख मन में कोई ऐसी बात
जो उजाड़ दे ज़िंदगी कर दे राख।
देख ज़रा उस सीमा पर तैनात जवान
वो भी किसी का दुलारा पर खड़ा सीना तान।
जीवन में कुछ कर दिखाने की हो बात
ज़िंदगी यु ख़त्म करो तो आँसुओ की बारात।
प्राण न्योछावर ही करने है तो मातृभूमि के लिये
कर्तव्य, माता-पिता और धर्म के लिये।
हो सके तो किसी एक का जीवन सँवारना है।
अमुल्य जीवन ठुकराना नहीं हँसकर स्वीकार करना है।

- कल्याणी (शुभदा जगताप)
२३ जून २०२०

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

सहावी दुर्गा - पद्मजा