Posts

Showing posts from August, 2020

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य

  थोडक्यात ..... थोडस काहीतरी ....   ८. असामान्यातली सामान्य                                     ---  शुभदा जगताप   नुकताच ऍमेझॉन प्राइम वर शकुंतला देवी हा चित्रपट पाहिला. नेहमीप्रमाणेच विद्या बालन ने अभिनय कशास म्हणावं हे दाखवून दिलय. कथा भन्नाट आणि तेवढीच अचंबित करणारी. एकीच्या जीवनावर आधारित आणि हिरो म्हणाल तर आपली एक भारतीय स्त्री ब्रिटिश काळात जन्मलेली   ( एकुणातच) त्यावेळच्या मानाने क्रान्तिकारी विचारांची. माझ्याप्रमाणेच कित्येक भारतीय नव्या - जुन्या पिढितल्याना जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व कळण्यास याने हातभार लाभेल यात शंका नाही! हया कोण देवी आहेत की ज्यांच्यावर एक चित्रपट निघावा ,  निदान या उत्सुकसतेपोटी जरी गूगल सर्च केलेत तर निव्वळ तोंडात बोट घालण्यासारखे काहीतरी नवीन कळेल आणि त्याही पुढे जाऊन   चित्रपट पाहिलात तर दोन तास नक्कीच वाया जाणार नाहीत ,  याची हमखास खात्री!   जगभरात " ह्यूमन कॉम्पुटर" या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शकुंतला देवी यांचा जन्म एका कन्नड ब्राह्मण कुटुंबात १९२९ साली कर्नाटक येथे झाला. आपल्या मुलीमध्ये अंकांना समजून घेऊन कितीही कठीण गणिते सोडवि