Posts

Showing posts from September, 2020

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ९. चिरतरुण आशा (ताई)

  थोडक्यात ..... थोडस काहीतरी ....     ९. चिरतरुण आशा (ताई)                                      ---  शुभदा जगताप   मुळातच रेडिओ वर सुंदर शांत आवाजाच्या निवेदकासह गाणी ,  संगीत ऐकणे हा एक सुखद अनुभव. (मी आकाशवाणी व विविधभारती याबद्दल बोलतेय ,  उगाच अखंड (बिनकामाची) बडबड चालणाऱ्या स्टेशन्स बद्दल नाही ,  हे लक्षात आलेच असेल चाणाक्ष रसिकांच्या!). तर सकाळी ५ वाजेपासून आकाशवाणी वर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुरु होतो ,  पण आज जरा उशिराच लावला रेडिओ आणि एकामागून एक सरस आशाताईंची गाणी. क्या बात ..... आज त्यांचा वाढदिवस नाही का ! दर वर्षी ही तारीख लक्षात असते.  रेडिओवर त्यांच्याच गाण्यांची रेलचेल असते दिवसभर ,  जसे ४ ऑगस्ट ला किशोर कुमार यांच्या गाण्यांची. हे दोन्ही कलाकार माझे अत्यंत आवडते. पैकी किशोरदांबरोबर माझा ही वाढदिवस असतो ,   तर आशाताईंचा वाढदिवस सहजच लक्षात राहतो (४ आणि ८ हे आकडेच तसे आहेत म्हणा!)  असो. तर वयाची सत्याऐंशी (८७) वर्षे पूर्ण करणाऱ्या या चिरतरुण कलाकाराला खूप खूप शुभेच्छा.   मंगेशकर कुटुंबातील ५ भावंडांपैकी १ आशाताई. बाकी सगळ्यांचे आडनाव एकच राहिले आणि या मात्र  ' आशा