थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ९. चिरतरुण आशा (ताई)

 थोडक्यात ..... थोडस काहीतरी ....

 

 ९. चिरतरुण आशा (ताई)

                                    --- शुभदा जगताप

 

मुळातच रेडिओ वर सुंदर शांत आवाजाच्या निवेदकासह गाणीसंगीत ऐकणे हा एक सुखद अनुभव. (मी आकाशवाणी व विविधभारती याबद्दल बोलतेयउगाच अखंड (बिनकामाची) बडबड चालणाऱ्या स्टेशन्स बद्दल नाहीहे लक्षात आलेच असेल चाणाक्ष रसिकांच्या!). तर सकाळी ५ वाजेपासून आकाशवाणी वर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुरु होतोपण आज जरा उशिराच लावला रेडिओ आणि एकामागून एक सरस आशाताईंची गाणी. क्या बात ..... आज त्यांचा वाढदिवस नाही का ! दर वर्षी ही तारीख लक्षात असते.  रेडिओवर त्यांच्याच गाण्यांची रेलचेल असते दिवसभरजसे ४ ऑगस्ट ला किशोर कुमार यांच्या गाण्यांची. हे दोन्ही कलाकार माझे अत्यंत आवडते. पैकी किशोरदांबरोबर माझा ही वाढदिवस असतो,  तर आशाताईंचा वाढदिवस सहजच लक्षात राहतो (४ आणि ८ हे आकडेच तसे आहेत म्हणा!)  असो. तर वयाची सत्याऐंशी (८७) वर्षे पूर्ण करणाऱ्या या चिरतरुण कलाकाराला खूप खूप शुभेच्छा.

 

मंगेशकर कुटुंबातील ५ भावंडांपैकी १ आशाताई. बाकी सगळ्यांचे आडनाव एकच राहिले आणि या मात्र 'आशा भोसलेया नावानेच प्रसिद्ध पावल्या. आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींच्या जीवनात जसे अनेक उतार चढाव येतातखूप धडपड करावी लागतेअगदी तसच काहीस यांनीही त्यांच्या आजवरच्या प्रवासात पाहिलं आहे. त्यावर जास्त भाष्य न करता महत्वाच काय की कधी त्यांचा चेहरा उदासवाणा किंवा आवाज थकलेला जाणवला नाही. मुलाखतीतही त्या मनमोकळेपणाने न लपवता बोलतात अगदी भरभरून! त्यांचे फोटो किंवा कार्यक्रम ही बघाकिती प्रेसेंटेबल आहेत त्या! (आम्ही शिकायला हव). एक छानशी साडीकेसांचा अंबाडा अथवा तत्सम केशभूषा (पेहेरावाला साजेशी)त्यात छानशी फुले किंवा गजरा माळलेला आणि साजेसे अलंकार (बरेचदा मोत्यांचे). किती प्रसन्न वाटत बघून. मुळातच त्यांचं मन आनंदी असावं आणि म्हणून त्यायोगे येणारी प्रसन्नता चेहऱ्यावर जाणवते. आणि गाली पडणाऱ्या खळ्यांचं तर काही बोलायलाच नको. त्याही त्यांचे सूर ऐकून मुग्ध होत असाव्या!

सहज कुठलाही मूड  पकडून तो गाण्यातून आपल्यापर्यंत पोहचवणाऱ्या आशाताई मनाला नक्कीच खूप भावतात. मराठी जुनी गाणीनाट्यसंगीत अथवा नाच रे मोरा सारखे अजरामर बालगीत असोप्रत्येक गाण्यात तो तो भाव सहजच गायला त्यांनी. रुपेरी वाळूत सारखं प्रियकराला आळवणार अथवा चौकट राजा मधील एक झोका सारख संमिश्र भावनांचं गाणं असोदोन्हीकडे आशाताई वेगळ्या भासतात. अनेक लावण्या त्यानी गायल्यात पैकी रेशमाच्या रेघांनीबुगडी माझी सांडली ग या विशेष आवडीच्या. त्यांचा ऋतू हिरवा अल्बम एकदा तरी ऐकला पाहिजेइतकी अप्रतिम गाणी आहेत त्यात. हिंदीतही अनेक गाणी आहेतखूप लोकप्रिय. जुन्या काळातील मधुबाला पासून ते काजोलउर्मिला आणि करिश्मा साठी ही तितक्याच उत्साहाने त्या गायल्या आहेत. कित्येक पुरस्कारगिनीज बुक मध्ये नोंदइतकं सगळं असूनही जमिनीवरच पाय ठेऊन असणाऱ्या अशा महान  कलाकारांचा आदर्श आजच्या पिढीने ठेवला पाहिजेअसं बरेच प्रसंग बघून वाटत. त्यांनी गायलेल्या गाण्यांबद्दल अनेकांनी अनेक वेळा लिहिलं आहेतरी आमच्यासारख्याना त्यांच्याबद्दल थोडं तरी लिहिण्याचा मोह आवरत नाही. त्यांची गायन साधना व गायन क्षेत्रातील योगदान किती महत्वपूर्ण आहे हे तरुण पिढीही जाणून आहे हे विशेष. त्यांची गाणी आजही किती ऐकावीशी वाटतात आणि येणारी पिढीही ते मनापासून ऐकतील यात शंका नाही! 

आज आकाशवाणीवर (१०७. १ FM Rainbow) वर निवेदक व निवेदिकेने त्यांच्यासारख्याच उत्साहात त्यांच्या मुलाखतीतील काही किस्से सांगत अप्रतिम गाणी ऐकवली त्याबद्दल आकाशवाणी चे आभार! काही गोष्टींवर भाष्य करताना आशाताईनी खंत व्यक्त केली की आजची तरुण पिढी लगेचच कशी काय एवढी स्ट्रेसड होते आणि नैराश्यग्रस्त होते ते कळात नाही. तसेच संगीत क्षेत्रात पाहिजे तस टॅलेंट नाही दिसत ज्याबद्दल त्या नाराजी व्यक्त करतात. बोलता बोलता त्यानी त्यांच्या या प्रवासातले अनेक किस्से सांगितले.  एका टेक मध्ये कस संपूर्ण गाणं रेकॉर्डिंग व्हायचंत्यासाठी रात्र रात्र जागणे१५ तासात ७ गाणी गायलेला त्यांचा विक्रमआणि लतादीदींसारख्या गानकोकिळेची बहीण म्हणून होणारी तुलना व त्यातूनही पुढे जात स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्यासाठी घेतली मेहनतत्यांचं या क्षेत्रासाठीच समर्पण दर्शवत. (एवढ सगळं आपल्याला नाही ना जमत .... थोडासा अपयश मिळाल की आपण लगेच डिप्रेशन मध्ये जातो...शिकायला हव आनंदाने जगणंनाही का?). 

बरत्या खूप सुगरण ही आहेत स्वयंपाकातहे आवर्जून सांगावस वाटत. गायिका नसते झाले तर chef नक्कीच झाले असतेअसं त्या स्वतःच सांगतात. देश परदेशात आशाज  (Asha's) या नावाने हॉटेल्स आहेत. त्यांच्या काही खास रेसिपीज चे हक्क एका ब्रिटन च्या व्यक्तीने विकत घेतलेतहे ही कमालाच नाही का? Age is just a number, ही म्हण खरी ठरवली आहे त्यांनी!

आजही तितक्याच उत्साहाने वावरणाऱ्या आशाताईंना 'चिरतरुणही बिरुदावली खरोखर सार्थ ठरतेय. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभोत्या अशाच आनंदी व तरुण राहोत व त्यांच्या मराठी हिंदी गाण्याचा खजिना आपल्यासारखे रसिक लुटत राहोतया सदिच्छांसह..... आशाताईंना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!

 

-कल्याणी (शुभदा जगताप)

८ सप्टेंबर २०२०


Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य