Posts

Showing posts from March, 2023

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

  आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न .....                                                       ----------- शुभदा जगताप   १९९१ साली मराठी रंगभूमीवर आलेलं " बंडखोर नाटक " चारचौघी पुन्हा एकदा नव्या कलाकारांसह अवतरलं आहे आणि ते पाहण्याचा योग काल आला . सातारा   शहरातील पहिल्याच प्रयोगाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला . संपूर्ण नाट्यगृह हाऊसफुल होतं आणि तीनही अंकात कमालीची शांतता होती प्रेक्षकांत . आजच्या झटपट च्या जमान्यात ३ अंकी नाटक रसिकांनी मन लावून पाहावं , त्यास दाद द्यावी , आणि तेही ३१ वर्षांपूर्वीच्या नाटकाला , काय कमाल आहे नाही ! लेखक प्रशांत दळवींच्या लेखणीची ताकद , दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीची दमदार हाताळणी , कलाकारांची हुकुमी टीम आणि सगळंच काही , अशी मस्त भट्टी फार क्वचित जमून येते .... ९१ साली अवघी १० वर्षांची असताना आई - वडील या नाटकाविषयी चर्चा करतानाचे अंधुकसे आठवते . नंतर वय आणि समजण्याइतकं शहाणपण वाढल्यावरही ह्या नाटकाचा उल्लेख जेव्हा जेव्हा कानी प