Posts

Showing posts from April, 2024

पुस्तक परिचय - एक भाकर तीन चुली

 पुस्तकाचे नाव  -  एक भाकर तीन चुली     भाषा - मराठी    लेखकाचे नाव - श्री देवा झिंजाड   प्रकाशन    -   NEW ERA Publishing House   परिचय कर्ती   - शुभदा जगताप जाधव, सातारा.  शिव-शक्ती , मधील शक्ती हे स्त्रीचे रूप ...  शक्ती - शारीरीक, मानसिक की दोन्ही? ती जर शक्तीचं रूप आहे , तर मग सर्वात जास्त (तुलनेने) अन्याय-अत्याचार तिच्यावरच का होतात ?  आणि या सगळ्याला तोंड देत देत शेवटच्या श्वासापर्यंत मातृत्व टिकविण्याची तिची जी धडपड आहे, त्यात तिच्या सहनशक्तीचा कस लागतो, तर तिने तरी कुठवर धीर धरावा?  हे  असे  एक ना अनेक प्रश पडत राहतात, दोन्ही डोळ्यांना धारा लागतात आणि वाचतोय ते सर्वकाही आपल्या समोर घडत आहे परंतु आपण हतबल आहोत, काहीच करू शकत नाही; फक्त निमूटपणे ते बघत राहणे आणि हळहळ  व्यक्त करणे - ती सुद्धा मनातल्या मनातच.... एवढेच आपल्या हाती आहे ...  बाई -माणसाने किती तडजोडी कराव्या? नवरा मेल्यावर अशा गावात जिथे रूढी-परंपरांना अन्यन्यसाधारण महत्व आहे, तिने किती कष्ट उपसावे? तारुण्यात (त्या काळी - म्हणजे जवळपास ६०-७० वर्षांपूर्वी) तिने स्वतःचे शील जपण्यासाठी किती वेळा दुर्गा-आणि काली बनाव? आणि