Posts

Showing posts from July, 2024

इश्क

 खुदा हमारे जैसे शौक  किसीको न दे  बस होश संभल जाये तबतक  पुरे फना हो बैठते है  शौक था हमे इश्क का  बस देखा करते थे ख्वाब  कही तो होगा हमसफर  जुनून यार के दिदार का हर वक्त जब दिल आया  तो न ही आवाज पहुची  ना हमारी तनहाईया  ना ही दिल की तेज धडकने  बस देखते गये  हमारी उम्मीदो का टुटना  अगणित मे बिखरना  फिर जे जुड जाने के लिये  इस उम्मीद मे की  कम्बखत कही तो वो दिल होगा  जो डूब जायेगा हमारे इश्क मे... हम इश्क के इंतजार मे  हर वक्त बेकरार... इश्क तो बरकरार है  इश्क तो बरकरार है.....

पाऊस आणि मी

 खूप साधं सरळ जीवन होतं... चटणी भाकरीच पण खूप चवीची  माणसं जवळ होती  मनाने  एका हाकेला धावणारी  घरं साधी सर्वांसाठी उघडी असायची हळू हळू दारं बंद होत गेली... आधी घरांची  मग मनांची  माणसांची.... आता एकटेपणा फक्त सोबत असतो आपल्या....नशीब तो तरी साथ सोडत नाही आपली....  आणि आपण शोधत बसतो कारणे त्यांची.... स्वतःतच.... न बोलता.... जाब न विचारता... स्वतःलाच....  मग मातीचे पुतळे तरी बरे अशी आपली अवस्था होते.... खोल खोल नेणारी  कधीही वर परत न आणणारी.... तरीही पाऊस मात्र येतो वेळेवर.... तो कोसळला की बरं वाटतं.... आपणही कोसळून मोकळे होतो.... मनातून  डोळ्यातून... पुन्हा नवीन सल भरून घेण्यासाठी..... मनात जागा तर रिकामी पाहिजे ना.... ती जागा हे कोसळणं करून देतं.... म्हणून  म्हणून  पाऊस खूप आवडतो.... धो धो कोसळणारा.... मोकळा होतो तो  मलाही तसं कर असं सांगत सांगत.... कोसळत राहतो.... आणि मीही.....