पाऊस आणि मी

 खूप साधं सरळ जीवन होतं...

चटणी भाकरीच पण खूप चवीची 

माणसं जवळ होती 

मनाने 

एका हाकेला धावणारी 

घरं साधी सर्वांसाठी उघडी असायची




हळू हळू दारं बंद होत गेली... आधी घरांची 

मग मनांची 

माणसांची....



आता एकटेपणा फक्त सोबत असतो आपल्या....नशीब तो तरी साथ सोडत नाही आपली.... 


आणि आपण शोधत बसतो कारणे त्यांची.... स्वतःतच.... न बोलता.... जाब न विचारता... स्वतःलाच.... 


मग मातीचे पुतळे तरी बरे अशी आपली अवस्था होते....

खोल खोल नेणारी 


कधीही वर परत न आणणारी....



तरीही पाऊस मात्र येतो वेळेवर....

तो कोसळला की बरं वाटतं....

आपणही कोसळून मोकळे होतो....

मनातून 

डोळ्यातून...



पुन्हा नवीन सल भरून घेण्यासाठी.....

मनात जागा तर रिकामी पाहिजे ना.... ती जागा हे कोसळणं करून देतं....

म्हणून 


म्हणून 

पाऊस खूप आवडतो.... धो धो कोसळणारा....

मोकळा होतो तो 

मलाही तसं कर असं सांगत सांगत....

कोसळत राहतो....


आणि मीही.....

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य