Posts

Showing posts from January, 2022
Image
  कातर सांज कातर सांज ही  लोटता जाईना  धडधड अशी , हृदयात दिसता दिसेना  दिवे ही लागले कळता कळेना आजही वाट नशिबी टळता टळेना  विरह रात ही सरता सरेना साजन वाट, लोचन थकता थकेना दिस उद्याचा तरी आशेचा किरण पुन्हा चक्र नवीन  थांबता थांबेना..... - कल्याणी ( शुभदा जगताप ) २५.१२.२१
Image
चित्रकाव्य अनुबंध रातीच्या राणी तुझं गुपित असं काय गे? कुणासाठी गंध तू माझ्यासंग धाडी गे?? माझं हे गुपित माझ्या मनाच्या कुपीत रे तुला का सांगू मी तू माझा कोण रे?? तुझा मी सवंगडी सखा अन सोबती तुझ्याच संगती रोजच्या  माझ्याही राती सुगंधी.... पण कुणासाठी फुले तू अजून मला सांगत नाही  का गे एवढं गुपित तुझं गूढ गूढ होत जाई?? अरे वेड्या कसे तुला अनुबंध आपुले कळत नाही? तुझ्याविना जीव माझा कुठंही असा रमत नाही... रातीच्या शांत अन एकांताच्या वेळी रे न बोलता दो जीव एकमेका साद घाली रे तिची हाक त्याला रे   जेव्हा सुगंध माझा तुझ्यासंगे दूर दूर  तू पल्याड वाहतो रे.... माझा गंध तुला अर्पून मीही तुझी होते रे.... तुझी माझी संगत अशी जिवा शिवाची जोडी रे... कळलं तुझं गुपित राणी रातीला तूझा बहर का  मी ही वेडा धुंद होतो रातराणीच्या मोहात या....  -कल्याणी (शुभदा जगताप) 29/01/2022