कातर सांज

कातर सांज ही 

लोटता जाईना 

धडधड अशी , हृदयात

दिसता दिसेना 


दिवे ही लागले

कळता कळेना

आजही वाट नशिबी

टळता टळेना 


विरह रात ही

सरता सरेना

साजन वाट, लोचन

थकता थकेना


दिस उद्याचा तरी

आशेचा किरण

पुन्हा चक्र नवीन 

थांबता थांबेना.....


- कल्याणी ( शुभदा जगताप )

२५.१२.२१

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य