Posts

Showing posts from February, 2023
 मी पण न देगा देवा  'मी' पण न देगा देवा मी  कायमच आशावादी  सहसा  लवकर हार न मानणारा  जिद्द धैर्य बुद्धीची चुणूक  ही माझीच मापदंड! कायम वरचढ!! हो  अहंकार तर आहेच की   होताच  तो माझा दागिना मोठा  अगदी माझ्या निर्मितीपासूनच  मला चिटकलेला! गर्वाने मिरवलेला!! मग  मग काय मी उन्मत्त  इतर  माझ्यापुढे तुच्छ ही मग्रुरी  वाढला मग मनमानीपणा   मलाच नेणारा! माझ्याच अधोगतीकडे!! बुद्धी  गहाण ठेऊन प्रगती केली  प्रगती  म्हणतात खरे सगळेच  पण मनास माझ्या पक्के ठाऊक  विनाश अटळ! माझा स्वहस्ते!! कसा? शतकापूर्वी महामारी  आजही  तीच अवस्था आमची  नजरकैद आम्ही आमचेच  कोंडले श्वास!  जगणे भकास!! प्राणी  इतर ज्यांना तुच्छ मानिले  यातही  हिंडती मात्र स्वत्रंत  निसर्गाची उधळण सर्वत्र  आणि आम्ही! हतबल गात्र! आता  ठरविले एकच निर्धाराने  समान  दर्जा प्रत्येकाचा इथे  माणूस म्हणून आपणही थिटे  निसर्ग महान! गुरु आपुला!! येत्या  नवीन वर्षात सारासार विचार  केवळ  भौतिक आभासी जग नोहे  माणुसकी भूतदया हेचि दान   मोकळा श्वास! जोडू हात ....जोडू हात !! -कल्याणी (शुभदा जगताप) ३१ डिसेंबर २०२० टीप: सरत्या वर्षात मानवाला मिळालेला
 कविते....तू मज कवेत घे कविता.... तू मनातली आस  भावनांचे तरल चित्र  हृदयीची गुजगोष्ट नेत्रांचे अबोल कटाक्ष  कविता..... तू सखी अनमोल  कविता.... तू हळव्या मनाचा हुंकार  प्रतिभेचा जणू अविष्कार  सांजवेळी मिश्र किलबिल वेलींची सुगंधी कमान कविता.... तू सुमनांची आरास कविता..... तू अन्यायाचा विरोध गर्जत करिते उपहास  अधोरेखित विरोधाभास  नीतिमत्ता कर्तव्यकठोर कविता.... तू ढाल तलवार कविता.... तू संतांचे उपदेश समाज आरसा प्रतिबिंब निसर्ग अवकाश जपणूक भान -तत्व-माणूसपण कविता.... तू सृष्टीचा जीव कविता.... तू काल आज उद्याही न संपते तुझी निर्मिती संसार त्याग समाधान मोक्ष तुझ्यात सामावले अवघे विश्व् कविता..... तू निरंतर नित्य नूतन कविते.... मज तुझी नूतनता दे मज तुझी व्यापकता दे मज तुझी भावतरलता दे मज तुझ्यासम विहरु दे.... कविते.... गतजन्मीचे ऋणानुबंध आपुले विसरू नको याही जन्मातले तुजसाठी प्रसन्न सरस्वती मज अवघे अवकाश व्यापू दे.... कविते.... तू मज कवेत घे तू मज कवेत घे.... -कल्याणी (शुभदा जगताप) २१.०३.२०२१
 नदी आणि मी  वाट कुठे दिसेना  जाऊ कुठे? कशी?  प्रवाहीच  जीवन माझे  सांग ना, थांबू कशी? ।।१।। नदी बोलती झाली  उभी ठाकली माझ्या दारी  अचंबित मी, रूप शांत  रौद्र जरी दिसे बाहेरी ।। २।। निमिषात सावरले गं  कशी मिळाली शक्ती  नमस्कार तिला आधी  मग धाडस संभाषणी ।।३।।  गे माये, मी वदले  तू नसता जीवन संपेल   पण दारी आमुच्या आलीस  तर हा संसार उधळेल ।।४।।  इतुका वेळ ती शांत  मात्र, आसवे ढळली  रडू येते लेकरांसाठी  पण आता निश्चये  खचली ।।५।।  तुम्ही काय विकास साधला?  लक्ष्मणरेषा पार केल्या  अतिक्रमण ते माझ्याच उरी  नाईलाज! आले तुझीया दारी ।।६।। मज हवा तो मार्ग  तीरावर फुलवून चैतन्य असते मी सदा प्रसन्न  मार्गक्रमण समुद्राकडे ।।७।। पण हाय! काय सांगू? माझीच अडचण झाली जणू  सैरभैर माझे जल आता  नुरली जागा, माझा नाईलाज ।।८।। पातळी धोक्याची, माझी? नाही ओलांडली असती मी पण उल्लंघन तुमचेच  आज उलटले पूररुपी।।९।।  वेळ ना गेली अजूनही  तुम्ही उद्याचे नायक  नतमस्तक व्हा निसर्गाला  आणि मर्यादा सांभाळा तुमच्या  ।।१०।। असे म्हणूनी ती माय माझे दार सोडूनी गेली  मी मात्र नि:शब्द खंत करीत  झाले नतमस्तक तत्क्षणी ।।११।। हाहा