Posts

आठवी दुर्गा - विशाखा

  * नवरात्र .... नऊ दिवस ..... नऊ कथा .....*                   *---- शुभदा जगताप *   २४ / १० / २०२०   आज नवरात्रीची आठवी माळ ! आज देवीच्या महागौरी या रूपाची आराधना केली जाते .   गौर म्हणजे गोरा , सफेद . सफेद रंग शुद्धतेचे प्रतिक आहे . शुद्धता निरागसतेमधून येते . महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ . महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते .   * आठवी दुर्गा - विशाखा *   विशाखा आणि जयश्री यांची जोडी संपूर्ण हॉस्टेल मध्ये फेमस होती .   दोघी ही एकदम विरुध्द्व स्वभावाच्या , पण मैत्री झाली ती कायमचीच ! इंजिनियरिंग करून विशाखा मास्टर्स साठी गुजरात च्या मोठ्या नावाजलेल्या कॉलेजात आलेली आणि जयश्री महाराष्ट्रातून आलेली . दोघी ही   सामान्य कुटुंबातल्या पण शिक्षणाचे महत्व खूप जाणून होत्या . त्यामुळे पदवीने नंतर खूप चांगली स्थळे आली त...

सहावी दुर्गा - पद्मजा

*नवरात्र....नऊ दिवस.....नऊ कथा.....* *---- शुभदा जगताप* २२/१०/२०२० आज नवरात्रीची सहावी माळ! आज देवीच्या कात्यायनी या रूपाची आराधना केली जाते. देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट दर्शविणारे हे रूप आहे. यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. आजच्या माझ्या कथेची जी नायिका आहे तिचं एक आगळेवेगळं वैशिष्ट्य अस आहे की मातृत्वाच्या रूपामध्ये तिने आपला सच्चा नातेसंबंध जपला. स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होऊन अगदी मनापासून तिने दिलेले वचन पाळले होते. त्याच्याशी एकनिष्ठ राहिली आणि शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न नियतीकडूनच चांगल्या रीतीने सोडवला गेला. पद्मजाची ही कहाणी चारचौघीपेक्षा निश्चितच खूप वेगळी आहे. तुम्हाला ती आवडेल अशी मी आशा करते. *सहावी दुर्गा - पद्मजा* त्या पाच जणींचा ग्रुप विशेष होता. इंजिनिअरिंग कॉलेजला तिघी एका शाखेत व उरलेल्या दोघी वेगळ्या तरी मैत्री घट्ट. एकमेकांविषयी आपलेपणा शेवटपर्यंत टिकून राहिला कॉलेज संपून बाहेरच्या व्यवहारी जगात प्रवेश केला तरीही! शरण्या, कनिका, पद्मजा, सानिका आणि ऋजुता अशा या पाचही अगदी भिन्न स्वभावाच्या आणि भिन्न पार्श्वभूमीच्या मैत्रि...