Posts

Showing posts from 2017

दिल की बातें

दिल की बातें गिला नही कोई किसीसे ना ही कोई शिकवा है बस अब मन भर सा गया है और दिल बहोत भारी भारी है| दोस्ती निभाने मे हम माहिर थे आज भी है और रहेंगे कल भी मगर मायने ही दोस्ती के बदले है कुछ इस कदर की दोस्त किसे कहे और किसे ना कहे यहा तक की दोस्ती भी करे या ना करे कुछ ऐसा संभ्रम है इस दिल मे| दोस्ती की तो छोडो बात प्यार की कुछ अलग नही दास्तान नाप तोलके जताया जाता है स्वार्थ दिखे तो मुस्कान भर छा जाता है और कुछ काम के ना बचे तुम तो एक नजर भर के मोहताज बन जाओ अब तो वो एहसास भी न देखने को मिले तो प्यार इस दुनिया से चला तो नही जायेगा कुछ ऐसा संभ्रम है इस दिल मे| दोस्ती प्यार अब बडी बडी बाते लगती है उससे भी जी उब जाये मगर ये क्या इंसानियत कीं भी बहोत कमी नजर आती है कुछ दो बाते अच्छी बताने जाओ तो आप सबसे पहले भीड से बाहर कुछ इस कदर पेश आते है अपने भी की कितनी बडी भूल कर बैठे हो तुम अब तो इंसान भी क्या जानवर से बढकर रहेंगे कुछ ऐसा संभ्रम है इस दिल मे| बातो बातो मे बात बिगड जाती है दोस्तो की याद तो मगर दिल मे रहती ही है प्यार की वो दास्ताने रह रहके याद त

मृत्यूपंथ

मृत्यूपंथ जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला । परी शेवटी काळमुखी निमाला।। महाथोर ते मृत्यूपंथेची गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ।। समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या या श्लोकामध्येही आपल्या सर्वांच्याच जीवनातील एक अटळ आणि सत्य घटनेची आठवण करून दिलिये ती म्हणजे मृत्यू. आलेल्या प्रत्येकाला एके दिवशी मरणे आहेच. मग व्यर्थ चिंता कशाला? महाथोर, यशवंत, नावाजलेले आणि अगदी सामान्यातले सामान्य सुद्धा एक ना एक दिवस मरणारच आहे. मग फरक कुठे उरतो ? की तुम्ही जगलात कसे ?  बाबा (माझे सासरे श्री. बापूसाहेब जाधव ) चे निधन होऊन आता तीन महिने झालेत. शेवटच्या क्षणीचे  त्यांचे दर्शन अजून डोळ्यांसमोर ताजे आहे आणि ते आयुष्यभर राहील.  अतिशय शांत आणि समाधानी चेहरा, देह निपचित, अतिशांत झालेला. जणू अतिप्रेमाने थापटल्या नंतर बालकाला जशी मातेच्या मांडीवर झोप लागते आणि ते बालक त्या निद्रेचा मनापासून आनंद घेत असतो. अगदी तसच काहीतरी भासल त्यांच कलेवर बघून! फरक एवढाच की ही त्यांची शेवटची आणि चिरनिद्रा होती. मृत्यूपंथ हा शब्द कितीएक दिवस तरी मनात घोळत आहे. योगायोग असा की बाबांच्या निधना आधी काही दिवस

प्रेम

प्रेम... प्रेम - विषयच मोठा गहन आहे. गहन का तर किती एक जणानी आजपर्यंत ह्या विषयावर खोलवर विचार केला, मांडला, व्याखेत बसविण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही ' प्रेम म्हणजे नक्की काय असत हो?' अस विचारणारे कायमच आहेत आणि विचारणार्यांची संख्या कधी कमी झालेली नाही. तुम्ही आम्ही , बहुतेक सर्वांनीच प्रेम कधी ना कधी, कुठे ना कुठे अनुभवलेल आहेच. पण मग तरीही नक्की प्रेम काय असत याची पूर्णपणे उकल झालेली व्यक्ती अजून तरी बघण्यात नाही. प्रेमाचे पैलूच तितके विविधरंगी आणि नात्यानुसार बदलत जाणार त्याच स्वरूप! लहान मुले आई दिसली नाही की सैरभैर होतात आणि उलटपक्षी आई चीही अवस्था तिच. प्रेमाची खूप जास्त उत्कटता अनुभवता येते या नात्यात. पण तिच मुले मोठी झाली की त्यांच जग वेगळ आणि प्रेमाच वेगळ रुप मित्र मैत्रिणी,  शिक्षक, कामातले सहकारी, प्रियकर/ प्रेयसी, नवरा /बायको या टप्प्यांत अनुभवास येत. आई ही तिच संपूर्ण विश्वच जणू असणार ते मूल जगात स्वछंद विहार करण्यास आपल्या बंधनातून मुक्त करते. या टप्प्यावर तिच प्रेम कमी नाही उलट वाढलेलच असत पण काहीस अव्यक्त स्वरुपात! तिच्या नकळतच प्रेम काळजीत बदलत! श्री

गुजगोष्टी

उपेक्षितांचे अंतरंग उपेक्षित कुणास म्हणावे? बऱ्याच जणाना! कुणी प्रेमासाठी उपेक्षित, कुणी अन्नासाठी, वस्त्रासाठी आणि निवाऱ्यासाठीही. कुणी पाण्यासाठी तर कुणी देवाच्या कृपेसाठी. अनेक प्रकारानी उपेक्षा होते. पण एखादा जीवच जन्माला उपेक्षित म्हणून येतो कधीतरी कुठेतरी. नाईलाजास्तव त्या जिवाला जन्म दिला जातो. मग तिथूनच त्याची उपेक्षा, कुचंबणा सुरु होते. सर्वांत महत्वाची गोष्ट या जगात फक्त प्रेम आणि प्रेमच! म्हटलय कुणीतरी की प्रेमाने जगही जिंकता येत! आणि प्रेमाची उपेक्षा इतर सर्व उपेक्षापेक्षा सर्वांत भयानक दु:खदायक. त्या जीवाची सुरुवातच प्रेमाच्या उपेक्षेने आणि अंतही त्यातच! पण लहानपणापासूनच उपेक्षा ही त्या जिवाला बाळकडू सारखी वाटते आणि ते तस तस घडत जात, टणक होत आणि इतरांपेक्षा जीवनातील दु:खाना झेलण्यासाठी जास्त समर्थ बनतो. हृदयाची जखम सतत ओली ठेवत ओठांवर कायम हसू बाळगण, हेच त्या जीवाच प्रारब्ध! उपेक्षेतच त्याची उत्पत्ती, उपेक्षेतच स्थिती आणि लयही उपेक्षेतच! अजाण वयात त्या जीवाला मानसिक त्रास नक्कीच होतो पण समज यायला लागली की तो हे सर्व सहज स्वीकारतो. सावलीसारखी उपेक्षा त्याच्या सोबत व

गंध ओल्या मातीचा

गंध ओल्या मातीचा गंध ओल्या मातीचा भिनतोय नसानसांत तुझ्या स्पर्शजाणिवा नकळत  आता आठवे क्षणाक्षणात गंध ओल्या मातीचा मी श्वास भरून घेतो मायभूची आठवण आणि हृदयी डोह भरून वाहतो गंध ओल्या मातीचा मज पुनपुन्हा उभारतो नशीबाचे आणिक घाव  झेलण्या बळ देतो गंध ओल्या मातीचा त्या गावा तू जाशील का? हरवले ते सवंगडी कुठे तू त्यांना बिलगून येशील का? मी माझा एकटा उद्विग्न सगळे कसे छिन्नविछिन्न अगा जीव थांबला घेता गंध ओल्या मातीचा कल्याणी (शुभदा)  २२/०६/२०१७

मी कोण?

 मी कोण? तुझा शेवटही मीच आणि आरंभही मीच  तुझ्या  जीवनास मिळाली  ती अवीट गोडीही  मीच  माझ्याच गर्भात असे  तुझ्या जीवनाचे बीज  घेशील श्वास शेवटचा निवांत  ती मायेची पृथाही असे मीच  माय नसता घरी दारी  बहिणीची होते ती आईही मीच  सखी सोबती मैत्रीण वा प्रेयसी  हृदयीची हाक ऐकते तीही मीच  तुज संगे  बांधिते जीवनगाठी  तुझ्याच विश्वात रमते ती मीच  सोडून सर्व भावविश्व आधीचे  नव्याने  संसार फुलवी तीही मीच  तिला वसाच दिला तो विधात्याने  प्रेम माया निर्माण नि समर्पण  अपमान छळ न व्हावा 'ति'चा  हीच एक आंतरिक तळमळ! - कल्याणी  ७ फेब्रु २०१७