गुजगोष्टी

उपेक्षितांचे अंतरंग

उपेक्षित कुणास म्हणावे?
बऱ्याच जणाना! कुणी प्रेमासाठी उपेक्षित, कुणी अन्नासाठी, वस्त्रासाठी आणि निवाऱ्यासाठीही. कुणी पाण्यासाठी तर कुणी देवाच्या कृपेसाठी. अनेक प्रकारानी उपेक्षा होते. पण एखादा जीवच जन्माला उपेक्षित म्हणून येतो कधीतरी कुठेतरी. नाईलाजास्तव त्या जिवाला जन्म दिला जातो. मग तिथूनच त्याची उपेक्षा, कुचंबणा सुरु होते.
सर्वांत महत्वाची गोष्ट या जगात फक्त प्रेम आणि प्रेमच! म्हटलय कुणीतरी की प्रेमाने जगही जिंकता येत!
आणि प्रेमाची उपेक्षा इतर सर्व उपेक्षापेक्षा सर्वांत भयानक दु:खदायक. त्या जीवाची सुरुवातच प्रेमाच्या उपेक्षेने आणि अंतही त्यातच!
पण लहानपणापासूनच उपेक्षा ही त्या जिवाला बाळकडू सारखी वाटते आणि ते तस तस घडत जात, टणक होत आणि इतरांपेक्षा जीवनातील दु:खाना झेलण्यासाठी जास्त समर्थ बनतो. हृदयाची जखम सतत ओली ठेवत ओठांवर कायम हसू बाळगण, हेच त्या जीवाच प्रारब्ध! उपेक्षेतच त्याची उत्पत्ती, उपेक्षेतच स्थिती आणि लयही उपेक्षेतच!
अजाण वयात त्या जीवाला मानसिक त्रास नक्कीच होतो पण समज यायला लागली की तो हे सर्व सहज स्वीकारतो. सावलीसारखी उपेक्षा त्याच्या सोबत वावरते. उपेक्षाच त्याची मैत्रीण, तीच सखी आणि शेवटच्या क्षणीही साथ देणारी तिच. त्या उपेक्षित जीवाच्या अंतरंगात सामावलेली.

शुभदा.

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य