पुस्तक परिचय: मटीरियल वर्ल्ड
आम्ही पुस्तकप्रेमी सप्ताह क्रमांक : २६७ १९ ते २५ ऑक्टोबर एकूण पुस्तक क्रमांक: १८७४ - १८८० पुस्तक क्रमांक : ०७ आजची दिनांक : २५/१०/२०२६ पुस्तकाचे नाव: मटीरियल वर्ल्ड मूळ लेखक: एड कॉन्वे अनुवाद: डॉक्टर अजेय हर्डीकर प्रकाशन: मधुश्री पब्लिकेशन पृष्ठ संख्या: ३९२ मूल्य: रु. ५००/- परिचयकर्ती शुभदा जगताप जाधव, सातारा. फोन नंबर 9987515657 कालच माझे आणि लेकीचे संभाषण सुरू होते. माझे जे प्रोफेशन आहे त्या विषयाबद्दल. सध्या पुस्तक परिचय सुरू आहेत आणि तुम्हा सर्वांचे अभिप्राय आले की मी तिच्याशी शेअर करत असते. तिला सांगितलं माझ्या आवडीच्या विषयांचे पुस्तक मी घेऊन त्यावर लिहू शकते; त्यासाठी या निमित्ताने मला वेळ मिळतोय यामुळे मला एक वेगळा आनंद रोज मिळतोय. तर तिचं म्हणणं असं पडलं की आई तू कशाला टेक्निकल फिल्डमध्ये आलीस. तू तर खरं साहित्यातच रमायला पाहिजे होतं. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच आहे गेले चार दिवस. आणि मग तिने जो प्रश्न विचारला त्याला उत्तर देताना मी सांगितलं की चॉईस वगैरे असं काही नव्हतं गं आजपासून 25-30 वर्षांपूर्वी. दहावीला चांगले मार्क मिळाले की विज्ञान ही शा...