Posts

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

  आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न .....                                                       ----------- शुभदा जगताप   १९९१ साली मराठी रंगभूमीवर आलेलं " बंडखोर नाटक " चारचौघी पुन्हा एकदा नव्या कलाकारांसह अवतरलं आहे आणि ते पाहण्याचा योग काल आला . सातारा   शहरातील पहिल्याच प्रयोगाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला . संपूर्ण नाट्यगृह हाऊसफुल होतं आणि तीनही अंकात कमालीची शांतता होती प्रेक्षकांत . आजच्या झटपट च्या जमान्यात ३ अंकी नाटक रसिकांनी मन लावून पाहावं , त्यास दाद द्यावी , आणि तेही ३१ वर्षांपूर्वीच्या नाटकाला , काय कमाल आहे नाही ! लेखक प्रशांत दळवींच्या लेखणीची ताकद , दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीची दमदार हाताळणी , कलाकारांची हुकु...
 मी पण न देगा देवा  'मी' पण न देगा देवा मी  कायमच आशावादी  सहसा  लवकर हार न मानणारा  जिद्द धैर्य बुद्धीची चुणूक  ही माझीच मापदंड! कायम वरचढ!! हो  अहंकार तर आहेच की   होताच  तो माझा दागिना मोठा  अगदी माझ्या निर्मितीपासूनच  मला चिटकलेला! गर्वाने मिरवलेला!! मग  मग काय मी उन्मत्त  इतर  माझ्यापुढे तुच्छ ही मग्रुरी  वाढला मग मनमानीपणा   मलाच नेणारा! माझ्याच अधोगतीकडे!! बुद्धी  गहाण ठेऊन प्रगती केली  प्रगती  म्हणतात खरे सगळेच  पण मनास माझ्या पक्के ठाऊक  विनाश अटळ! माझा स्वहस्ते!! कसा? शतकापूर्वी महामारी  आजही  तीच अवस्था आमची  नजरकैद आम्ही आमचेच  कोंडले श्वास!  जगणे भकास!! प्राणी  इतर ज्यांना तुच्छ मानिले  यातही  हिंडती मात्र स्वत्रंत  निसर्गाची उधळण सर्वत्र  आणि आम्ही! हतबल गात्र! आता  ठरविले एकच निर्धाराने  समान  दर्जा प्रत्येकाचा इथे  माणूस म्हणून आपणही थिटे  निसर्ग महान! गुरु आपुला!! येत्या  न...
 कविते....तू मज कवेत घे कविता.... तू मनातली आस  भावनांचे तरल चित्र  हृदयीची गुजगोष्ट नेत्रांचे अबोल कटाक्ष  कविता..... तू सखी अनमोल  कविता.... तू हळव्या मनाचा हुंकार  प्रतिभेचा जणू अविष्कार  सांजवेळी मिश्र किलबिल वेलींची सुगंधी कमान कविता.... तू सुमनांची आरास कविता..... तू अन्यायाचा विरोध गर्जत करिते उपहास  अधोरेखित विरोधाभास  नीतिमत्ता कर्तव्यकठोर कविता.... तू ढाल तलवार कविता.... तू संतांचे उपदेश समाज आरसा प्रतिबिंब निसर्ग अवकाश जपणूक भान -तत्व-माणूसपण कविता.... तू सृष्टीचा जीव कविता.... तू काल आज उद्याही न संपते तुझी निर्मिती संसार त्याग समाधान मोक्ष तुझ्यात सामावले अवघे विश्व् कविता..... तू निरंतर नित्य नूतन कविते.... मज तुझी नूतनता दे मज तुझी व्यापकता दे मज तुझी भावतरलता दे मज तुझ्यासम विहरु दे.... कविते.... गतजन्मीचे ऋणानुबंध आपुले विसरू नको याही जन्मातले तुजसाठी प्रसन्न सरस्वती मज अवघे अवकाश व्यापू दे.... कविते.... तू मज कवेत घे तू मज कवेत घे.... -कल्याणी (शुभदा जगताप) २१.०३.२०२१
 नदी आणि मी  वाट कुठे दिसेना  जाऊ कुठे? कशी?  प्रवाहीच  जीवन माझे  सांग ना, थांबू कशी? ।।१।। नदी बोलती झाली  उभी ठाकली माझ्या दारी  अचंबित मी, रूप शांत  रौद्र जरी दिसे बाहेरी ।। २।। निमिषात सावरले गं  कशी मिळाली शक्ती  नमस्कार तिला आधी  मग धाडस संभाषणी ।।३।।  गे माये, मी वदले  तू नसता जीवन संपेल   पण दारी आमुच्या आलीस  तर हा संसार उधळेल ।।४।।  इतुका वेळ ती शांत  मात्र, आसवे ढळली  रडू येते लेकरांसाठी  पण आता निश्चये  खचली ।।५।।  तुम्ही काय विकास साधला?  लक्ष्मणरेषा पार केल्या  अतिक्रमण ते माझ्याच उरी  नाईलाज! आले तुझीया दारी ।।६।। मज हवा तो मार्ग  तीरावर फुलवून चैतन्य असते मी सदा प्रसन्न  मार्गक्रमण समुद्राकडे ।।७।। पण हाय! काय सांगू? माझीच अडचण झाली जणू  सैरभैर माझे जल आता  नुरली जागा, माझा नाईलाज ।।८।। पातळी धोक्याची, माझी? नाही ओलांडली असती मी पण उल्लंघन तुमचेच  आज उलटले पूररुपी।।९।।  वेळ ना गेली अजूनही  तुम्ही उद्याचे नाय...
Image
  कातर सांज कातर सांज ही  लोटता जाईना  धडधड अशी , हृदयात दिसता दिसेना  दिवे ही लागले कळता कळेना आजही वाट नशिबी टळता टळेना  विरह रात ही सरता सरेना साजन वाट, लोचन थकता थकेना दिस उद्याचा तरी आशेचा किरण पुन्हा चक्र नवीन  थांबता थांबेना..... - कल्याणी ( शुभदा जगताप ) २५.१२.२१
Image
चित्रकाव्य अनुबंध रातीच्या राणी तुझं गुपित असं काय गे? कुणासाठी गंध तू माझ्यासंग धाडी गे?? माझं हे गुपित माझ्या मनाच्या कुपीत रे तुला का सांगू मी तू माझा कोण रे?? तुझा मी सवंगडी सखा अन सोबती तुझ्याच संगती रोजच्या  माझ्याही राती सुगंधी.... पण कुणासाठी फुले तू अजून मला सांगत नाही  का गे एवढं गुपित तुझं गूढ गूढ होत जाई?? अरे वेड्या कसे तुला अनुबंध आपुले कळत नाही? तुझ्याविना जीव माझा कुठंही असा रमत नाही... रातीच्या शांत अन एकांताच्या वेळी रे न बोलता दो जीव एकमेका साद घाली रे तिची हाक त्याला रे   जेव्हा सुगंध माझा तुझ्यासंगे दूर दूर  तू पल्याड वाहतो रे.... माझा गंध तुला अर्पून मीही तुझी होते रे.... तुझी माझी संगत अशी जिवा शिवाची जोडी रे... कळलं तुझं गुपित राणी रातीला तूझा बहर का  मी ही वेडा धुंद होतो रातराणीच्या मोहात या....  -कल्याणी (शुभदा जगताप) 29/01/2022 

टिपेश्वर जंगल सफारी - ७ व ८ मार्च २०२०

Image
टिपेश्वर जंगल सफारी - ७ व ८ मार्च २०२० ७ व ८ मार्च २०२० म्हणतात ना, काही गोष्टी घडण्यासाठी योगच यावा लागतो. अगदी तसच काहीस माझ्या बाबतीत विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातील जंगल दर्शनाबाबतीत झालं. माझं आजोळ (आईचे माहेर) यवतमाळ जिल्हा, दारव्हा तालुक्यातील टाकळी (बु) हे एक छोटेसे खेडेगाव. तालुक्याच्या ठिकाणापासून बसने एक गाव, तिथून पायी चालत पहिली नदी ओलांडून दुसरे गाव व पुन्हा चालत जाऊन दुसरी नदी पार करून आजोबांचं गाव! दरवर्षी न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत २ महिने मनसोक्त राहत असू. आंबे, चिंचा, विहिरीत पोहणे (अर्थात, पाणी असलेल्या, जी एक मामाच्या शेतात होती; कारण विदर्भात मे महिना एकदम खतरनाक!), संध्याकाळी ५-५;३० नंतर शेतात फिरायला जाणे, दुपारी आंब्याच्या झाडावर डाब-डुबलया खेळ खेळणे (सूरपारंब्या सारखा कदाचित), असे मजेत दिवस जायचे. मामांकडून यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणच्या जंगलांबद्दल ऐकायला मिळायच. एकदा दारव्हा हुन यवतमाळ ला जाताना घाटातून प्रवास झालाय आणि त्या जंगलाचं लांबूनच दर्शन झालं होतं, पण काही मोजक्या क्षणांसाठीच ! पण जंगलाचा अनुभव त्याच्या आत शिरून काही तास (दिवस व महिने घालवणारेही अ...