Posts

Showing posts from May, 2020

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ६. सहजीवनाचा सोहळा ....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ६. सहजीवनाचा सोहळा   ....                                 - शुभदा जगताप सहजीवनाची दशकपूर्ती   - अक्षरश: याच शब्दात सकाळी सकाळी वडिलांनी फोन करून शुभेच्छा दिल्या .... ते दोन शब्द ऐकून खूप वेळ हसू आलं मला ... पण खरंच की .. सहजीवनाची १० वर्षे पूर्ण केली आज आम्ही! खूप साऱ्यांच्या शुभेच्छांचा पाऊस पडला ..... आणि गेल्या १० वर्षातील अनेक लहान सहान घटना डोळ्यासमोरून तरळून गेल्या. नाही म्हणता म्हणता एक दशकाचा टप्पा ओलांडला की हो आज आम्ही ! सहजीवन - काय अर्थपूर्ण शब्द आहे नाही ? एकमेकांना समजून घेऊन , गुण - दोषांसकट सांभाळून घेणे , रुसवे भुगवे , लग्नानंतरची दोघांचीही बरीचशी धडपड एकमेकांचा स्वभाव नीट कळेपर्यंतची .... किती काय काय असत ना या संसारात ? वाटतो इवलासा....सुरुवातीला .... पण कठीणही असतो तो बरेचदा... निभावता निभावता दमछाक होते काही जणांची ....   तारेवरची कसरत ही असते कधी कधी .... संतुलन खूप महत्वाचे ! काही काळ खूप अडचणींचा ही येतो , जिथे खरी कसोटी लागते एकमेकांना दिलेल्या वचनांची! १० वर्षातही बरच गाठोडं भरलं आहे आठवणींच! २५ - ३५-४० वर्

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ५. एक मोठा ब्रेक, आपण आणि थांबलेली मुंबई…

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ५. एक मोठा ब्रेक , आपण आणि थांबलेली मुंबई …                                                       - शुभदा जगताप अरे यार खूपच दगदग होतेय सध्या....नोकरी घर नोकरी घर .... घरी फक्त झोपायला आणि वीकएंड तर कसा येतो आणि जातो ते कळतही नाही. अस वाटत की संपूर्ण इंडिया मध्ये फक्त मुंबईच्याच लोकांना घाई असते , सतत पळापळ .... बोर हो गया यार ... एक बडा ब्रेक चाहिये ! desperately yaar!!!   - इति .... एक मित्र दुसऱ्या मित्राला .... मुबई लोकल प्रवासात ... हिंदी मराठी इंग्रजी यांची सरमिसळ होऊन तयार झालेल्या पण प्रत्येकाला खूप जवळच्या वाटणाऱ्या एकदम एक्सप्रेसिव्ह भाषेत.... आपली आगतिकता व्यक्त करतोय आणि दुसराही मान डोलावून आणि आपलं जीवन किती व्यर्थ आहे चा टिपिकल लूक देऊन दुजोरा देतोय. अरे अरे हो..... मला माहिती आहे अजून मुंबई लोकल बंद आहेत आणि महिनाभर तरी सुरु होणार नाहीयेत .... हा जो प्रसंग आहे ना तो जागतिक महामारी संकटामुळे झालेल्या लॉकडाऊन च्या आधीचा बरं का.... कित्येक वेळा तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवलेला , बघितलेला .... वर्षानुवर्षे हाच प्रकार चाललेल

थोडक्यात ..... थोडस काहीतरी ..... ४. लोकल को ग्लोबल बनाओ......

थोडक्यात ..... थोडस काहीतरी ..... ४. लोकल को ग्लोबल बनाओ......                                                          - शुभदा जगताप सर्वांचे डोळे आणि कान ज्याकडे लागले होते ते म्हणजे आपले आदरणीय मोदीजी काय सांगताय ते. एकदाचे त्यांनी ज्या काही घोषणा करायच्या त्या केल्या आणि आज अर्थमंत्र्यांचे विश्लेषण ही झाले. सगळंच समजलं असही नाही आणि काहीच समजलं नाही असही नाही! असो !! पण तूर्तास तरी बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेऊया आणि मोदीजींच्या ज्या एका वाक्याने माझं (इतरांचही बहुदा) लक्ष वेधून घेतलं - लोकल को ग्लोबल बनाओ , त्याबद्दल बोलूया. गेल्या काही वर्षांपासून स्वदेशी वस्तूंबाबत आपण सर्वच जण थोड्याफार प्रमाणात का होईना पण जागरूक झालोय , हे मान्य करायला हवे. मानसिकतेत आणि विचारांत बदल झाला की तो बदल हळू हळू आपल्या कृतीतूनही दिसू लागतो , हे खरंच खूप प्रामाणिक निरीक्षण आहे माझं! अजून कुणाचं कशाला माझच सांगते. - गेली कित्येक वर्षे मी इंडियन मेड - मेडीमिक्स साबण वापरतेय. खरंच खूपच चांगली quality अजूनही मेंटेन्ड आहे या साबणाची. फार पूर्वी कधीतरी दूरदर्शनवर याची जाहिरात बघितले

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ३. खिचडी

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ३. खिचडी - कल भी थी आज भी है और कल भी रहेगी आता शीर्षक वाचून म्हणाल - हे काय आता नवीन ? तर नवीन अस काहीच नाही तर तिच्याबद्दल लिहावस वाटतय बरेच दिवसांपासून (स्पेशली लॉक-डाउन सुरु झालय तेव्हापासून) जी आपणा बहुतेक स्त्रियांची लाडकी सखी आहे ..... हो तीच जी काही मिनिटात तयार होते आणि सखी गृहिणी ला स्वयंपाकघरात अत्यंत कठीण परिस्थितीत उपयोगास पड़ते .......   हो तीच ती आपली आवडती - खिचड़ी !    - बर आता कोणकोणत्या कठीण परिस्थितीत ही मदतीस धाऊन येते , तर बघा हां ---- --- नोकरी करणारी सखी जी सकाळी ५:३०-६ पासून उठलेली असते आणि दोन्ही वेळा लोकल च्या गर्दीचे धक्क्के खाऊन दिवसभर मेंदूचा भुगा करुन थकून घरी पोहोचलेली असते आणि रात्रीच जेवण तिलाच बनवायच असत ---- एक उद्योजिका / स्वतःचा व्यवसाय करणारी , लोकल चा नाही पण प्रवास आहे ; सगळा व्यवसाय एकटीच चालवणारी , क्लायंटस ला तोंड देऊन थकून गेलेली घरी आलेली असते आणि दोघांपुरता का होईना रात्रीच जेवण बनवायच असत ---- चौकोनी कुटुंब , सपोर्ट सिस्टिम नाही , नवरा बाहेरगावी कामानिमित्त गेलेला , ती आजारी पडलीये आणि दोन

थोडक्यात ..... थोडस काहीतरी ..... २. शिल्पा चार चांद लगाये ....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी ..... २. शिल्पा चार चांद लगाये ....  - शुभदा जगताप आठवतात का ह्या ओळी ...एका जाहिरातीच्या आहेत. एक सुंदर तरुणी, गुलाबीसर साडी नेसलेली, गळ्यात मोत्याची माळ आणि कपाळावर ठळक बिंदी लावलेली .... मरून रंगाची! कपाळावर टिकली लावते आहे आणि मग हॅन्ड पर्स घेऊन जाताना दिसते. हे सगळं दाखवताना शिल्पा चार चांद लगाये... शिल्पा चार चांद लगाये .... ह्या मस्त गुणगुणाव्याशा वाटणाऱ्या ओळी .... हो... ही जाहिरात शिल्पा बिंदी ची! मला वाटत आतापर्यंत तुमच्या डोळ्यासमोर ती जाहिरात आणि त्यातील ती आकर्षक मॉडेल व तिच्यापेक्षाही आकर्षक मोठी मरून रंगाची बिंदी नक्कीच आली असेल! आज अचानक शिल्पा बिंदी ची आठवण का झाली असेल बुवा? अचानक अस काही नाही. मी गेली १२-१५ वर्षे टिकली म्हणून याच वापरत आहे, नंबर ७ आणि ८. आणि अजून थोडी मोठी हवी असेल तर नंबर ६. लहानपणापासूनच गंध किंवा टिकली ची सवय. आई आणून द्यायची त्या वापरायचो. पण जेवहा पहिल्यांदा ही शिल्पा ची जाहिरात दूरदर्शन वर पाहिली तेव्हापासून ती वापरावी असे ठरवले होते. यथावकाश नोकरी लागली आणि पहिल्यांदा ते शिल्पा बिंदी च पाकिट विकत घेतलं

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... १. काकूबाई लूक Vs मॉडर्न लूक

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... १. काकूबाई लूक Vs मॉडर्न लूक - शुभदा जगताप अग, लग्नात साडीच छान वाटते. तेवढाच साडी नेसण्यासाठी काहीतरी बहाणा मिळतो. - इति दोन मैत्रिणींच्या गप्पा. अरे देवा, तू तर फुल काकूबाई लूक मध्ये आज -  🙄 तर 'तिने' आज काय परिधान केलं होत? - सलवार कुर्ता ओढणीसहित, केस छान बांधलेले, हातात कडे, कपाळावर टिकली. - मस्त लखनवी वर्क केलेला अनारकली ड्रेस, ओढणीसहत. कपाळाला बारीकशी टिकली. - लग्नानंतर पहिलाच गणपती-गौरी सण, म्हणून छान काठापदराची साडी, केसांचा अंबाडा त्यात गजरा/ वेणी, कपाळाला थोडी मोठी टिकली, मनगटभर बांगड्या दोन्ही हातात. बर, हे मान्य असत की वरील सर्व attire मध्ये ती जरा जास्तच छान, आणि काय म्हणतात ते feminine, attractive वगैरे दिसत असते. डोळे भरून पहावसा वाटत, (नेत्रसुख घेतही असतात काहीजण  😜 🤓 )! पण - - पण .... अशा पारंपारीक अंगभर पोशाखात - केसांच्या वळणामुळे आणि मुख्यतः टिकलीमुळे - वय वाढलेलं दिसत ना बाई ! मग हा काकूबाई लूकच! टिकली लावणाऱ्या मुलींची संख्या कमी झालेली वाटत नाही का आजकाल?? आज कसं राहावं असं अपेक्षित आहे? - किशोरवय