थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... १. काकूबाई लूक Vs मॉडर्न लूक

थोडक्यात ..... थोडस काहीतरी ....

१. काकूबाई लूक Vs मॉडर्न लूक
- शुभदा जगताप

अग, लग्नात साडीच छान वाटते. तेवढाच साडी नेसण्यासाठी काहीतरी बहाणा मिळतो. - इति दोन मैत्रिणींच्या गप्पा.
अरे देवा, तू तर फुल काकूबाई लूक मध्ये आज - 🙄
तर 'तिने' आज काय परिधान केलं होत?
- सलवार कुर्ता ओढणीसहित, केस छान बांधलेले, हातात कडे, कपाळावर टिकली.
- मस्त लखनवी वर्क केलेला अनारकली ड्रेस, ओढणीसहत. कपाळाला बारीकशी टिकली.
- लग्नानंतर पहिलाच गणपती-गौरी सण, म्हणून छान काठापदराची साडी, केसांचा अंबाडा त्यात गजरा/ वेणी, कपाळाला थोडी मोठी टिकली, मनगटभर बांगड्या दोन्ही हातात.
बर, हे मान्य असत की वरील सर्व attire मध्ये ती जरा जास्तच छान, आणि काय म्हणतात ते feminine, attractive वगैरे दिसत असते. डोळे भरून पहावसा वाटत, (नेत्रसुख घेतही असतात काहीजण 😜🤓)! पण -
- पण .... अशा पारंपारीक अंगभर पोशाखात - केसांच्या वळणामुळे आणि मुख्यतः टिकलीमुळे - वय वाढलेलं दिसत ना बाई ! मग हा काकूबाई लूकच! टिकली लावणाऱ्या मुलींची संख्या कमी झालेली वाटत नाही का आजकाल??
आज कसं राहावं असं अपेक्षित आहे? - किशोरवयीन, तरुण, विवाहित आणि दोन लेकरांच्या आया झालेल्या मुलीनी देखील - तर .....
..... जीन्स - टी शर्ट (जीन्स गरज म्हणून नाही तर फैशन म्हणून), शॉर्ट्स, ३/४th, स्कर्ट टॉप, वन-पीस, स्लिव्हलेस (जास्त चांगले), जम्पसूट इ. केस मोकळेच असावे, शक्यतो. हातात एखाद कड वगैरे ठीक आहे. पण टिकली तर अज्जीबातच नको. आणि हो, संभाषण करताना (conversation) अधेमधे इंग्रजी शब्द आणि वाक्य टाकता यायलाच हवीत. तर हा सगळा आहे मॉडर्न लूक. 😁
जिची जशी आवड आणि ज्यात ती स्वतःला सर्वात जास्त comfortable 'महसूस' करते, खर तर तोच तिचा ओरिजिनल लूक नाही का? आणि तेच सुंदरही दिसत हो ना? 😍 मग नेहमी तो वरीलपैकी कुठल्यातरी 'लेबल'खाली कशाला जायला हवा?
.... आणि मुळातच आपली भारतीय संस्कृतीतली पारंपारिक वेशभूषा ही साजेशी, अंग-प्रदर्शन न करणारी, 'मर्यादाशील' आणि आपल्या येथील
भौगोलिक व सामाजिक परिस्थिती अनुसार चालत आलेली. ती पाश्चिमात्य पोशाखासमोर, जो 'आपण' खूपच जवळचा केलाय, आज काकूबाई लूक ठरतोय, याचे कारण काही कळत नाही बुवा! कदाचित दृष्टिकोन ज्याचा -त्याचा, आपणा सर्वाचाच, बरोबर ना?
- कल्याणी (शुभदा जगताप)
१० एप्रिल २०२०

Comments

  1. It's all about the perspective. व्यवस्थित मांडलं आहे !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

सहावी दुर्गा - पद्मजा