थोडक्यात ..... थोडस काहीतरी ..... २. शिल्पा चार चांद लगाये ....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .....

२. शिल्पा चार चांद लगाये ....
 - शुभदा जगताप

आठवतात का ह्या ओळी ...एका जाहिरातीच्या आहेत. एक सुंदर तरुणी, गुलाबीसर साडी नेसलेली, गळ्यात मोत्याची माळ आणि कपाळावर ठळक बिंदी लावलेली .... मरून रंगाची! कपाळावर टिकली लावते आहे आणि मग हॅन्ड पर्स घेऊन जाताना दिसते. हे सगळं दाखवताना शिल्पा चार चांद लगाये... शिल्पा चार चांद लगाये .... ह्या मस्त गुणगुणाव्याशा वाटणाऱ्या ओळी .... हो... ही जाहिरात शिल्पा बिंदी ची! मला वाटत आतापर्यंत तुमच्या डोळ्यासमोर ती जाहिरात आणि त्यातील ती आकर्षक मॉडेल व तिच्यापेक्षाही आकर्षक मोठी मरून रंगाची बिंदी नक्कीच आली असेल!
आज अचानक शिल्पा बिंदी ची आठवण का झाली असेल बुवा? अचानक अस काही नाही. मी गेली १२-१५ वर्षे टिकली म्हणून याच वापरत आहे, नंबर ७ आणि ८. आणि अजून थोडी मोठी हवी असेल तर नंबर ६. लहानपणापासूनच गंध किंवा टिकली ची सवय. आई आणून द्यायची त्या वापरायचो. पण जेवहा पहिल्यांदा ही शिल्पा ची जाहिरात दूरदर्शन वर पाहिली तेव्हापासून ती वापरावी असे ठरवले होते. यथावकाश नोकरी लागली आणि पहिल्यांदा ते शिल्पा बिंदी च पाकिट विकत घेतलं ७ रुपयांना! इतर साध्या टिकल्या तेव्हा ५ रुपयांना ३ पाकिटे मिळायच्या, म्हणजे तुलनेनं ह्या महागच होत्या की! पण खरंच मानलं पाहिजे जाहिरात करणाऱ्याला. काय खुबीने भारतीय स्त्रियांच्या अगदी हळव्या विषयाला हात घातला त्यांनी. पूर्वी स्त्रिया कुंकू वापरायच्या ज्याचा आपल्या त्वचेला काही त्रास होत नव्हता (निदान मला तरी माहीत नाही). मग हळूहळू स्त्रिया घराबाहेर पडायला लागल्या तस हे कुंकू किंवा गंध (लिक्विड) प्रकरण जरा जिकरीचे होऊ लागलं. इथेच रेडीमेड टिकली ने पाय रोवायला सुरुवात केली. अगदी सोप्पं काही सेकंदात बिंदी कपाळावर लावून व्ह्यायची, म्हणजे घराचं आणि ऑफिसचं ही बघणाऱ्या बिझी बिझी महिलांसाठी फारच उपयोगाची वस्तू की हो! पण जेव्हा काहींना त्वचेवर या टिकल्यांच्या गम चा त्रास होऊ लागला तेव्हा मग या टिकल्यांच्या क्वालिटी चा प्रश्न उभा राहिला. आणि हाच प्रश्न बहुदा ब्रॅण्डेड व क्वालीटी टेस्टेड बिंदी साठी मैलाचा दगड ठरला असावा. 'त्वचाविज्ञानाने चाचणी केलेले आणि बॅक्टेरिया विरोधी' असे ठळकपणे शिल्पा बिंदी ब्रॅण्ड वर लिहिलेले आहे. बर हे तर क्वालीटी किती आहे हे सांगण्यासाठी, पण मुख्यत्वे मार्केटिंग तंत्राने ग्राहकाच्या भावनेला जो हात घालावा लागतो (ज्याने अर्थातच खप वाढतो) ते काम या जाहिराती ने केलं. एखाद प्रोडक्ट पाहून ते घ्यावस वाटण आणि क्वालीटी असेल तर तेच कित्येक वर्षे वापरात राहणे, हे खरंच ते प्रॉडक्ट बनविणाऱ्या कंपनीची खरी कमाई ज्यात जाहिरात या मार्केटिंग तंत्राचा मोलाचा वाटा आहे! बर नुसती जाहिरात च नाही तर या पाकिटाच्या मागील बाजूस जी काही ३-४ वाक्य लिहिली आहेत, ती तर खूपच भावतात. त्यांचा भावार्थ साधारण असा - "प्रत्येक स्त्री ही खास आहे आणि तिला चांगल्यात चांगलं मिळालं पाहिजे. आणि तिचा अभिमानाचा (सौभाग्य दर्शक कुंकू /बिंदी) सोहळा व्ह्यावा यासाठी शिल्पा बिंदी प्रस्तुत आहे!" 😍
आज शिल्पा बिंदी च्या पाकिटाची किंमत १५ रुपये आहे. मॉडेल बदलली पण आजही नवीन डिझाईन मध्येही नवीन मॉडेल सोबत त्या जुन्या मॉडेलचाही फोटो आहे. ही टिकली वापरायला सुरुवात केल्यापासून आजतागायत शिल्पा ब्रँडच मी वापरतेय! एक ग्राहक म्हणून माझा या ब्रँड ला हीच पोचपावती!
आणि हो ..... प्रश्न राहिलाच की आज अचानक आठवण का झाली? तर अस झालं की आंघोळीनंरत या पाकिटातली टिकली लावणे हा नित्यनेम आणि आज दिसलं की पाकीट संपत आलय. आणि ते लवकर मिळणार नाही याची जाणीव झाली. अर्थात, नाही मिळालं तरी तक्रार नाही कारण हे काही महत्वाच नाही या लॉकडाऊन मध्ये; पण मन उगाच शिल्पा बद्दल आठवणीच्या हिंदोळ्यावर गेलं आणि हे मग लिहावसं वाटलं, बस इतकच! ☺️
बर इतकी वर्षे हा ब्रँड वापरतेय पण कुठल्या कंपनीच हे प्रॉडक्ट आहे , हा विचार काही कधी आला नाही डोक्यात. आता या काळात हाती असलेला रिकामा वेळ म्हणा अथवा आता मीही स्वतःचा उद्योग करते त्याचा परिणाम म्हणा, पण शोधाशोध केली, तर Paramount Cosmetics (I) Ltd, Tamilnadu ह्या अस्सल भारतीय कंपनीचं हे लोकप्रिय शिल्पा ब्रँड! १९८५ पासून आहे ही कंपनी आणि तिच्या यशस्वी वाटचालीला माझ्या शुभेच्छा !! नक्की वापरून पहा बर, अर्थात स्त्रियांनीच !!! 😜😜😜😜
- कल्याणी (शुभदा जगताप)
२९ एप्रिल २०२०

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य