थोडक्यात ..... थोडस काहीतरी ..... ४. लोकल को ग्लोबल बनाओ......



थोडक्यात ..... थोडस काहीतरी .....

४. लोकल को ग्लोबल बनाओ......
                            
                            - शुभदा जगताप

सर्वांचे डोळे आणि कान ज्याकडे लागले होते ते म्हणजे आपले आदरणीय मोदीजी काय सांगताय ते. एकदाचे त्यांनी ज्या काही घोषणा करायच्या त्या केल्या आणि आज अर्थमंत्र्यांचे विश्लेषण ही झाले. सगळंच समजलं असही नाही आणि काहीच समजलं नाही असही नाही! असो !!
पण तूर्तास तरी बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेऊया आणि मोदीजींच्या ज्या एका वाक्याने माझं (इतरांचही बहुदा) लक्ष वेधून घेतलं - लोकल को ग्लोबल बनाओ, त्याबद्दल बोलूया.

गेल्या काही वर्षांपासून स्वदेशी वस्तूंबाबत आपण सर्वच जण थोड्याफार प्रमाणात का होईना पण जागरूक झालोय, हे मान्य करायला हवे. मानसिकतेत आणि विचारांत बदल झाला की तो बदल हळू हळू आपल्या कृतीतूनही दिसू लागतो, हे खरंच खूप प्रामाणिक निरीक्षण आहे माझं! अजून कुणाचं कशाला माझच सांगते.
-गेली कित्येक वर्षे मी इंडियन मेड - मेडीमिक्स साबण वापरतेय. खरंच खूपच चांगली quality अजूनही मेंटेन्ड आहे या साबणाची. फार पूर्वी कधीतरी दूरदर्शनवर याची जाहिरात बघितलेली आठवते. पण प्रॉडक्ट ने स्वतःला सिद्ध केलं की खूप मार्केटींग ची गरज पडत नाही, असेच या साबणाच्या बाबतीत म्हणता येईल.
-मुलींसाठी ची इतकी विदेशी बनावटीची खूप भुरळ घालणारी वेगवेगळी उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. पण त्यातही आपली भारतीय उत्पादने ही खूप सरस आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर - हिमालया कंपनीचा नीम फेस वॉश! (बरीच वर्षे वापरतेय पण काही तक्रार नाही आजतागायत!).
- आपली डोंबिवलीतलीच (MIDC) दोन दर्जेदार उत्पादने - जाई काजळ आणि विको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम. आजही त्यांची क्रेझ कमी नाही झालीये!
-फार पूर्वी आम्ही कोलगेट वापरायचो. म्हणजे ब्रॅंडिंगच एवढ जबरदस्त झालेलं त्याच की टूथपेस्ट म्हणण्याऐवजी कोलगेट हाच शब्द परवलीचा झालेला! पण गेली किमान १० वर्षे तरी आम्ही मेसवाक वापरतोय. मस्त प्रॉडक्ट आहे - अस्सल भारतीय!
-आणि पार्ले-जी बिस्कीट ला कोण विसरेल? आमच्या आई वडिलांनी त्यांची चव चाखली, आम्हीही ते खाऊन मोठे झालो आणि आता माझ्या लहान मुलालाही ती खूप आवडतात! मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या विले-पार्ल्यातील ही कंपनी. इंटरनेट वर वाचनात आलं होत की २०११ सालच्या एका सर्वे रिपोर्ट नुसार - पार्ले-जी हा एक best-selling brand of biscuits in the world आहे. (वाक्य जसेच्या तसे मुद्दामच इंग्रजीत लिहिलय). याचा आपल्याला खचितच गर्व हवा ना! बर संपूर्ण जागाच जाऊ द्या, पण भारतात हे बिस्कीट जवळपास सगळीकडे मिळत आणि आजही तितक्याच आवडीने खाल्ल  जात, याबद्दल आपण या उद्योगसमूहाचं नक्कीच कौतुक करू शकतो नाही का? अशी अनेक मेड इन इंडिया उत्पादने आहेत जी त्यांच्या  quality मुळे आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. वेळ पुरणार नाही लिहीत बसलं तर!

पुन्हा लेखाच्या शीर्षकाकडे वळूया - तर लोकल को ग्लोबल बनाओ म्हणजे जास्तीत जास्त नव्हे तर सगळ्याच दैनंदिन वापरातल्या वस्तूंसाठी स्वदेशी भारतीय बनावटीच्या उत्पादनांचा आग्रह धरायचा! आपण सर्वांनीच. बघूया तरी प्रयत्न करून. कोरोनच्या ह्या ५० दिवसांच्या लॉकडाऊन नंतर एक गोष्ट निश्चितच सर्वांनाच कळतेय ती म्हणजे आर्थिक संकट संपूर्ण जगासाठी अटळ आहे. अस (मी नाही) बरेच अर्थतज्ञ् ही सांगताहेत. यात आपण काय करू शकतो? तर निदान एवढं तरी  की भारतात बनणाऱ्या वस्तूच वापरण्याचा संकल्प! ज्यायोगे आपल्याच इथल्या लघु-मध्यम-मोठ्या उद्योगांना कळत-नकळत पणे हातभार लाभेल. छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीही खूप मोठे बदल घडवू शकतात, अर्थात त्याला थोडा काळ जावा लागतो. लोकल वस्तू लोकल लेव्हल जरी वापरल्या गेल्या तरी पुष्कळ आहे, त्या कधीतरी ग्लोबल बनातीलच अशी आशा बाळगूया आणि त्या दिशेने प्रयत्न ही करूया की!

आणि हो, या लेखामागचा प्रामाणिक उद्देश काय - तर आपण एकमेकांना - मी कुठल made-in-India वापरते / वापरतो,- हे सांगून एकप्रकारे त्या उत्पादनाचं मार्केटिंगच करत असतो. (mouth-to-mouth publicity - ज्यातून मला वाटत ब्रॅण्डचं सगळ्यात जास्त मार्केटिंग होत असावं!) मी १०-२० जणांना सांगितल्यावर एकाने जरी विदेशी सोडून स्वदेशी चा वापर केला तर बदल तर घडतेच ना, अगदी छोटा का होईना ! आणि अशाच छोटया -मोठ्या गप्पांमधून आपण एकमेकांकडून प्रेरणा ही घेत असतो, बरोबर ना?

चूकभूल द्यावी घ्यावी, लहान तोंडी मोठा घास झाला असेल तर क्षमाही असावी! पण एकच विनंती - माझ्यासकट सर्वांनाच - स्वदेशी चा विसर न व्हावा!

- कल्याणी (शुभदा जगताप)
१३ मे २०२०

ता. क. - उत्पादनांची माहिती लिहिण्यात काही चूक झाली असेल तर कृपया कळवावे.

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य