Posts

वाट

वाट माझी एक नवीन कविता... एक वेगळेपण आहे .... प्रत्येक कडव्यात पहिल्या ३ ओळीत ६ अक्षरे  शेवटच्या ओळीत ४ अक्षरे  पहिल्या कडव्याचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या कडव्याचा पहिला शब्द.... अशी रचना झालीये कवितेची.... पहा कशी वाटतेय ते  विषय:  त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी..... ( त्याला हे ठाऊक नाही) दिवास्वप्न पाहाते.... त्याच्याशी मनोमन संवाद साधते.... त्याच्या साठी झुरते आणि वास्तव माहिती असूनही त्याची च वाट पाहतेय.... अशी ही वेडी.... तिच्या भावना रेखाटण्याचा प्रयत्न.... वाट दिवस सरले  कुणी न उरले मी ही का हरले  आर्त हाक  हाक रे प्रितीची  तुझ्या ओळखीची  बिकट वाटेची  मनी माझ्या माझ्या तू अंगणी  नाचे मी गगनी  पिंगा रे घालूनी  बेत स्वप्नी  स्वप्नी ध्यानी मनी  ये तो रात्रंदिनी  परी दिनवाणी  मी रे प्रिया प्रिया तूच प्रिय  करु सांग काय  की मी होय प्रिय तुज दिठी   दिठी जी आस   का विनासायास न कळे, हा भास  ...

ती च्या वळणावर

ती च्या वळणावर आज सहजच वळलो ' ती ' च्या वळणावर खूप पुढे गेलो आणि आलो आपसूकच भानावर ' ती ' च वळणच तस होत खट्याळ धुंद सुगंधी आकर्षक कितीही थांबवू ( स्वतःला ) म्हटलं तरी वळायचेच पाय आपोआप तिथवर ' ती ' ने काय नाही पाहिल आमची टवाळी यारी दोस्ती भेटी भांडण अन मस्ती आणि कधी केलेली दुनियादारी ' ती ' च्या वळणाकडे वळत जायचो हात हातात घालून गप्पा टप्पा मौजमजा करत शेवट व्हायचा समाधानी पोटपूजेत पण मजेचे दिवस संपत गेले मित्र देशी परदेशी उडून गेले उरलेले आम्ही अडकलो लग्नबंधनी हाय! आता ' ती ' ची आठवण फक्त स्वप्नी मधूनच कधीतरी ' ती ' च वळण आठवत खूप खूप विनाकारण पण फिरकायचही नाही तिकड हे मला ' स्वामिनी ' च साकड तेलकट खाऊ नये म्हणते आमची 'ही ' हृदयाच्या धमन्या होतील ब्लौक खातो आजकाल उकडलेल अन पुचाट ' ती ' करते मात्र डोक्यात क्लौक क्लौक असे सरलेत किती वर्षे माहित नाही ठेवतय कोण हिशोब परवा मात्र दचकलोच ... कारण पोरग वळल होत ' ती ' च्याच वळणावर आज विचारांच्या तंद्रीत हरवलो होतो अन ' ...

स्वातंत्र्य- आपापले

स्वातंत्र्य  - आपापले  ' मला माझ  स्वातंत्र्य खूप प्रिय  आहे. कुठल्याही  परिस्थितीत कुठल्याही कारणासाठी आणि  मुळात कुणासाठीही मी ते गमावू शकत नाही. ' इथे 'मी ' म्हणजे कुणीही बर का! मनुष्य प्राणी , प्राणी , देश, जमात, विचार आणि बरच काही. सजीवांच  म्हणाल तर मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की स्वातंत्र्याची जाणीव ही सर्वात पहिले! त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनुष्य! तस प्राणी असो वा पक्षी , त्यांनाही स्वातंत्र्य प्रियच आहे.  मात्र, त्यांनी निसर्गाच्या नियमांच पालन अजूनही चालू  ठेवल्याने ' स्वातंत्र्य ' हां विषय असा  काही फार अधोरेखित होत नाही. पण ... पण  जेव्हा हां स्वार्थी मनुष्य स्वत:च्या मनोरंजनासाठी म्हणा  किंवा इतर काही हेतूने या प्राण्यांच्या आणि एकंदरीतच निसर्गाच्या जीवनचक्रात हस्तक्षेप करतो, तेव्हा खरा स्वातंत्र्यावर घाला घातला जातो त्यांच्या. मग आलंच, गरज नसताना संघर्ष आणि  पुढील विस्कळीतपणा, सगळ्याच गोष्टींचा! मनुष्य , मग स्त्री असो वा पुरुष, स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता. कधी कानी कपाळी ओरडून सांगतो तर कधी मूकप...

दिल की बातें

दिल की बातें गिला नही कोई किसीसे ना ही कोई शिकवा है बस अब मन भर सा गया है और दिल बहोत भारी भारी है| दोस्ती निभाने मे हम माहिर थे आज भी है और रहेंगे कल भी मगर मायने ही दोस्ती के बदले है कुछ इस कदर की दोस्त किसे कहे और किसे ना कहे यहा तक की दोस्ती भी करे या ना करे कुछ ऐसा संभ्रम है इस दिल मे| दोस्ती की तो छोडो बात प्यार की कुछ अलग नही दास्तान नाप तोलके जताया जाता है स्वार्थ दिखे तो मुस्कान भर छा जाता है और कुछ काम के ना बचे तुम तो एक नजर भर के मोहताज बन जाओ अब तो वो एहसास भी न देखने को मिले तो प्यार इस दुनिया से चला तो नही जायेगा कुछ ऐसा संभ्रम है इस दिल मे| दोस्ती प्यार अब बडी बडी बाते लगती है उससे भी जी उब जाये मगर ये क्या इंसानियत कीं भी बहोत कमी नजर आती है कुछ दो बाते अच्छी बताने जाओ तो आप सबसे पहले भीड से बाहर कुछ इस कदर पेश आते है अपने भी की कितनी बडी भूल कर बैठे हो तुम अब तो इंसान भी क्या जानवर से बढकर रहेंगे कुछ ऐसा संभ्रम है इस दिल मे| बातो बातो मे बात बिगड जाती है दोस्तो की याद तो मगर दिल मे रहती ही है प्यार की वो दास्ताने रह रहके याद त...

मृत्यूपंथ

मृत्यूपंथ जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला । परी शेवटी काळमुखी निमाला।। महाथोर ते मृत्यूपंथेची गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ।। समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या या श्लोकामध्येही आपल्या सर्वांच्याच जीवनातील एक अटळ आणि सत्य घटनेची आठवण करून दिलिये ती म्हणजे मृत्यू. आलेल्या प्रत्येकाला एके दिवशी मरणे आहेच. मग व्यर्थ चिंता कशाला? महाथोर, यशवंत, नावाजलेले आणि अगदी सामान्यातले सामान्य सुद्धा एक ना एक दिवस मरणारच आहे. मग फरक कुठे उरतो ? की तुम्ही जगलात कसे ?  बाबा (माझे सासरे श्री. बापूसाहेब जाधव ) चे निधन होऊन आता तीन महिने झालेत. शेवटच्या क्षणीचे  त्यांचे दर्शन अजून डोळ्यांसमोर ताजे आहे आणि ते आयुष्यभर राहील.  अतिशय शांत आणि समाधानी चेहरा, देह निपचित, अतिशांत झालेला. जणू अतिप्रेमाने थापटल्या नंतर बालकाला जशी मातेच्या मांडीवर झोप लागते आणि ते बालक त्या निद्रेचा मनापासून आनंद घेत असतो. अगदी तसच काहीतरी भासल त्यांच कलेवर बघून! फरक एवढाच की ही त्यांची शेवटची आणि चिरनिद्रा होती. मृत्यूपंथ हा शब्द कितीएक दिवस तरी मनात घोळत आहे. योगायोग असा की बाबांच्या ...

प्रेम

प्रेम... प्रेम - विषयच मोठा गहन आहे. गहन का तर किती एक जणानी आजपर्यंत ह्या विषयावर खोलवर विचार केला, मांडला, व्याखेत बसविण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही ' प्रेम म्हणजे नक्की काय असत हो?' अस विचारणारे कायमच आहेत आणि विचारणार्यांची संख्या कधी कमी झालेली नाही. तुम्ही आम्ही , बहुतेक सर्वांनीच प्रेम कधी ना कधी, कुठे ना कुठे अनुभवलेल आहेच. पण मग तरीही नक्की प्रेम काय असत याची पूर्णपणे उकल झालेली व्यक्ती अजून तरी बघण्यात नाही. प्रेमाचे पैलूच तितके विविधरंगी आणि नात्यानुसार बदलत जाणार त्याच स्वरूप! लहान मुले आई दिसली नाही की सैरभैर होतात आणि उलटपक्षी आई चीही अवस्था तिच. प्रेमाची खूप जास्त उत्कटता अनुभवता येते या नात्यात. पण तिच मुले मोठी झाली की त्यांच जग वेगळ आणि प्रेमाच वेगळ रुप मित्र मैत्रिणी,  शिक्षक, कामातले सहकारी, प्रियकर/ प्रेयसी, नवरा /बायको या टप्प्यांत अनुभवास येत. आई ही तिच संपूर्ण विश्वच जणू असणार ते मूल जगात स्वछंद विहार करण्यास आपल्या बंधनातून मुक्त करते. या टप्प्यावर तिच प्रेम कमी नाही उलट वाढलेलच असत पण काहीस अव्यक्त स्वरुपात! तिच्या नकळतच प्रेम काळजीत बदलत! श्री...

गुजगोष्टी

उपेक्षितांचे अंतरंग उपेक्षित कुणास म्हणावे? बऱ्याच जणाना! कुणी प्रेमासाठी उपेक्षित, कुणी अन्नासाठी, वस्त्रासाठी आणि निवाऱ्यासाठीही. कुणी पाण्यासाठी तर कुणी देवाच्या कृपेसाठी. अनेक प्रकारानी उपेक्षा होते. पण एखादा जीवच जन्माला उपेक्षित म्हणून येतो कधीतरी कुठेतरी. नाईलाजास्तव त्या जिवाला जन्म दिला जातो. मग तिथूनच त्याची उपेक्षा, कुचंबणा सुरु होते. सर्वांत महत्वाची गोष्ट या जगात फक्त प्रेम आणि प्रेमच! म्हटलय कुणीतरी की प्रेमाने जगही जिंकता येत! आणि प्रेमाची उपेक्षा इतर सर्व उपेक्षापेक्षा सर्वांत भयानक दु:खदायक. त्या जीवाची सुरुवातच प्रेमाच्या उपेक्षेने आणि अंतही त्यातच! पण लहानपणापासूनच उपेक्षा ही त्या जिवाला बाळकडू सारखी वाटते आणि ते तस तस घडत जात, टणक होत आणि इतरांपेक्षा जीवनातील दु:खाना झेलण्यासाठी जास्त समर्थ बनतो. हृदयाची जखम सतत ओली ठेवत ओठांवर कायम हसू बाळगण, हेच त्या जीवाच प्रारब्ध! उपेक्षेतच त्याची उत्पत्ती, उपेक्षेतच स्थिती आणि लयही उपेक्षेतच! अजाण वयात त्या जीवाला मानसिक त्रास नक्कीच होतो पण समज यायला लागली की तो हे सर्व सहज स्वीकारतो. सावलीसारखी उपेक्षा त्याच्या सोबत व...