Posts

Showing posts from October, 2020

टिपेश्वर जंगल सफारी - ७ व ८ मार्च २०२०

Image
टिपेश्वर जंगल सफारी - ७ व ८ मार्च २०२० ७ व ८ मार्च २०२० म्हणतात ना, काही गोष्टी घडण्यासाठी योगच यावा लागतो. अगदी तसच काहीस माझ्या बाबतीत विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातील जंगल दर्शनाबाबतीत झालं. माझं आजोळ (आईचे माहेर) यवतमाळ जिल्हा, दारव्हा तालुक्यातील टाकळी (बु) हे एक छोटेसे खेडेगाव. तालुक्याच्या ठिकाणापासून बसने एक गाव, तिथून पायी चालत पहिली नदी ओलांडून दुसरे गाव व पुन्हा चालत जाऊन दुसरी नदी पार करून आजोबांचं गाव! दरवर्षी न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत २ महिने मनसोक्त राहत असू. आंबे, चिंचा, विहिरीत पोहणे (अर्थात, पाणी असलेल्या, जी एक मामाच्या शेतात होती; कारण विदर्भात मे महिना एकदम खतरनाक!), संध्याकाळी ५-५;३० नंतर शेतात फिरायला जाणे, दुपारी आंब्याच्या झाडावर डाब-डुबलया खेळ खेळणे (सूरपारंब्या सारखा कदाचित), असे मजेत दिवस जायचे. मामांकडून यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणच्या जंगलांबद्दल ऐकायला मिळायच. एकदा दारव्हा हुन यवतमाळ ला जाताना घाटातून प्रवास झालाय आणि त्या जंगलाचं लांबूनच दर्शन झालं होतं, पण काही मोजक्या क्षणांसाठीच ! पण जंगलाचा अनुभव त्याच्या आत शिरून काही तास (दिवस व महिने घालवणारेही अ

नववी दुर्गा - सानिका

* नवरात्र .... नऊ दिवस ..... नऊ कथा .....*                   *---- शुभदा जगताप *   २५ / १० / २०२०   आज नवरात्रीची नववी माळ ! आज देवीच्या सिध्दिदात्री या रूपाची आराधना केली जाते . तुम्ही स्व मध्ये स्थिर असाल तेंव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होईल , तेंव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असेल . गुरुकृपेमुळे “ प्राविण्य आणि मुक्ती ” या सिद्धीधात्रीने दिलेल्या देणग्या आहेत .   माझ्या आजच्या कथेची नायिका ही अशीच स्व मध्ये स्थिर झालेली आणि गुरुकृपेने आपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळविलेली अशी सानिका ... तुमच्या भेटीला .     * नववी दुर्गा -   सानिका *   आज सानिकाने पुन्हा आपल्या करियरची सुरुवात केली , तब्बल १० वर्षांच्या गॅप नंतर . खूप वेगळं वाटत होत तिला , साहजिकच आहे म्हणा . इतकी वर्षे घरी राहून होममेकर च्या भूमिकेत स्वतःला सिद्ध केल्यानंतर आता ती करियरची दुसरी इंनिंग खेळण्यास सज्ज झाली होती . समिंश्र भावनांचे हिंदोळे मनात , आज पहिला दिवस होता ना ऑफिस चा .   दिवसाची सु