नवरात्र.... नऊ दिवस..... नऊ कथा.....

 मैत्रिणींनो.... 

आज शारदीय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेपासून झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून मनात होते की या नऊ दिवसात ९ कथा लिहाव्या. त्या प्रत्येक कथेची मध्यवर्ती केंद्रबिंदू ही एक स्त्री असेल; अशी स्त्री जिने आपल्या आयुष्यात खंबीरपणे,  धाडसीपणाने एक वेगळा निर्णय घेतला आणि इतर चारचौघींसारखी न राहता काहीतरी वेगळं करून आपला ठसा उमटवला. स्वतःच्या जीवनात आणि इतरांच्याही! अशा विचाराने प्रेरित होऊन मी नऊ दिवसांच्या नऊ कथा लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये असणारी स्त्री,  त्या प्रत्येक कथेची नायिका ही जरी काल्पनिक असली तरी आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगांमधून, काही स्त्रियांनी जी मनावर छाप पडली,  त्यांच्याभोवती ही कथा गुंफत जाणार आहे. थोडे फार त्यांच्या आयुष्यातील प्रसंग आणि थोडे फार गुंफलेले अशी या कथांची पार्श्वभूमी असणार आहे. या स्त्रिया तुमच्या-माझ्या सारख्याच सामान्य स्त्रिया....  परंतु एका निर्णायक क्षणी खंबीरपणे त्यांनी उचललेले पाऊल हे त्यांना आपल्या चारचौघीं पेक्षा वेगळं ठरवतात.

मी आशा करते की तुम्हा सर्वांना या कथा आवडतील. 


तुमचीच सखी... 

शुभदा 😊

💜💗💜💗

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य