रुसणार किती?

 रुसणार किती?

#कविता ... अजून एक नवीन ....


अस बरेचदा होत ... जेव्हा काही लिखाण व्ह्यायच असेल ... त्याआधी विषय किंवा त्यासंदर्भातल्या काही ओळी सारख्या मनात आणि डोक्यात रुंजी घालत असतात.... कागदावर उतरवत नाही तोपर्यंत फारच गडबड असते बुवा ... सांगता सोय नाही किती ते... एकदाच लिहून काढलं की जीव भांड्यात पडल्यासारखा वाटतो! :)



खाली जी कविता लिहिली आहे तीच असच काहीस झालं ... पण वेगळेपण अस की चाल आधी मनात घोळत होती आणि नववधूचे आपल्या जोडीदारावर काही कारणामुळे रुसणे हा विषय होता ... बर कवितेची चाल आधीच ठरलेली ... मनाने ठरवली होती कि बुद्धीने ठाऊक नाही ... पण कविता जन्माला आली तीच ती चाल पकडून ... गम्मतच वाटली मला या प्रोसेस ची...

कविता cum गाणं आवडेल तुम्हा सर्वांना अस वाटतंय....



रुसणार किती?

रुसणार किती रुसणार किती

मजवरी प्रिये तू सांग आता

रुसणार किती।।धृ ।।



गाली हळूच हासू

नेत्री चोरटे बोलू

सुटणार किती सुटणार किती

माझ्या नजरेतून....... माझ्या नजरेतून सांग आता

सुटणार किती?? ।। १।।

रुसणार किती......

 

व्याकुळ जिवा दिलासा

जर हात देशी हाता

धरणार किती धरणार किती

माझ्याशी अबोला ....... माझ्याशी अबोला सांग आता

धरणार किती?? ।। २।।



रुसणार किती......

 

 

 

आधी आपुले मैत्र खरे

मग प्रेम-चाहूल लागे

झुरणार किती झुरणार किती

अजूनही मनात ...... अजूनही मनात तू सांग आता

झुरणार किती?? ।।३।।

 

रुसणार किती......


लग्न नसते ग हे बंधन

हृदयीचे हृदयी मिलन

रोखणार किती रोखणार किती

भावनाही तुझ्या ........ भावनाही तुझ्या तू सांग आता

रोखणार किती?? ।।४।।

रुसणार किती......

 

दिला झटकून राग लटका

जीव तुजसाठी च होय तुटका

रुसणार नाही रुसणार नाही

तुजवरी सख्या....... तुजवरी सख्या कधीही आता

रुसणार नाही.... ।।५।।


रुसणार किती...... रुसणार नाही....

रुसणार किती...... रुसणार नाही......



कल्याणी (शुभदा जगताप)

२० मे २०२०

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य