नवं - जुन

 नवं - जुनं

माझी नवीन कविता.. *नव-जुनं.*
ही कविता त्या दोघांमधला संवाद आहे जे पूर्वाश्रमीचे एकमेकांचे सोबती होते,  परंतु काही गैरसमजाने त्यांच्यामध्ये दरी निर्माण झाली ती कायमचीच. सगळं विसरून ती जेव्हा पुन्हा नव्याने सुरुवात करतेय नेमका तेव्हाच तिचा तो सोबती पुन्हा येऊन  (पश्चातापाने दग्ध ) माफी मागतोय आणि  नव्याने जुनं स्वीकारण्याच आर्जव  करतोय. त्या प्रसंगी तिने दिलेलं हे उत्तर....

*नवं - जुनं*

जुन्याचं नवपण 
आज फिरुनी आठवे
हुंदके आवरता 
धुके गडद गोठते ||१||

जवळी असताना 
किती रुसवे-फुगवे 
मनीचे सांगताना 
शब्द ओठात थीजले  ||२||

जाताना एकदाच 
मागे वळून बघ-रे 
तुझ्याही नकळत 
मोती डोळ्यात नाचरे ||३||

निरोप घेतलास 
केली कितीक आर्जवे 
कशास समजूत 
पुन्हा फिरुनी काढणे ||४||

नकोच जुनेपण 
नवा संसार अंगणी 
नव्यात हरवली 
तुझी जुनीच सोबती ||५||


 -- कल्याणी (शुभदा जगताप)
६ ऑक्टोबर २०२०


यामध्ये गम्मत आहे शब्दांची... 
प्रत्येक कडव्यात... 
पहिली आणि तिसरी ओळ - ३ अक्षरे + ४ अक्षरे 
दुसरी आणि चौथी ओळ - 
२ अक्षरे + ३ अक्षरे + ३ अक्षरे 

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य